आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाचे नेते नरेश अग्रवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; राज्‍यसभा उमेदवारी वरून सपा वर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल सोमवारी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. अग्रवाल यांनी येथे भाजप मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी अग्रवाल म्हणाले की, एखाद्या राष्ट्रीय पक्षात राहिल्याशिवाय देशाची सेवा करता येऊ शकत नाही. त्यामुळे मी भाजपत आलो आहे. अग्रवाल हे राज्यसभेचे खासदार असून त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. सपाने त्यांना पुढील निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही. त्याऐवजी जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अग्रवाल नाराज होते. सपाने चित्रपटांत काम करणाऱ्यांना आणि नृत्य करणाऱ्यांना माझ्यापेक्षा महत्त्व दिले आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले, पण त्यांची जया बच्चन यांच्याविषयीची टिप्पणी मान्य नाही, असे स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...