आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसाठी धोकादायक ठिकाणे कोणते? तुम्हाला माहिती आहे? धक्कादायक आहे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - आपल्या मुलींसाठी सर्वात धोकादायक ठिकाण कोणते हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर आहे घर. सर्वात धोकादायक हात कोणाचे, तर आप्तेष्ठांचे. हे सत्य धक्कादायक आहे. रेप कुठे झाला, हा चौकशीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. भास्करने याचे उत्तर शोधण्यासाठी 743 एफआयआरचा अभ्यास केला. त्यातून समोर आलेले सत्य भीतीदायक होते. घर, ट्यूशन सेंटर अगदी धार्मिक ठिकाणेही यापासून दूर नाहीत. 


जाणून घ्या.. स्पेशल रिपोर्ट.. 
- नॅशनल क्राइम रेकॉडर्स ब्युरोच्या 2015च्या एका रिपोर्टनुसार अत्याचारातील 95% प्रकरणांमध्ये परिचयातील लोकच आरोपी असल्याचे समोर आले. परिचयातील म्हणजेच वडील, भाऊ, आजोबा असे जवळचे नातेवाईक किंवा रोज घरी येणारे नीकटवर्तीय. खरंतर कोणतेही ठिकाण सुरक्षित नाही किंवा असुरक्षित नाही. वय महत्त्वाचे नाही किंवा ठिकाणही नाही. फक्त आणि फक्त दुषित मानसिकतेचे परिणाम चिमुरड्यांना भोगावे लागतात. 
- भास्करने 743 एफआयआर वाचल्या आहेत. बलात्काराची अनेक प्रकरणे पाहता हा प्रातिनिधिक चेहरा आहे. या एफआयआर आपल्या समाजाचे कटू सत्य समोर मांडतात. एफआयआरनुसार 55% प्रकरणांत घर हेच मुलींसाठी सर्वात धोकादायक ठिकाण बनले आहे. 


दरवर्षी 18 पेक्षा कमी वयाच्या 700 मुलींवर अत्याचार 
उदाहरणादाखल 2016 चे आकडे पाहुयात. अत्याचाराची एकूण 3656 प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी सहा प्रकरणांत तर पीडिता एवढ्या लहान होत्या की, त्यांच्याबरोबर काय झाले हे त्यांना नीट सांगताही येत नव्हते. सहा वर्षापर्यंतच्या या मुली आहेत. तर 37 प्रकरणे अशी होती ज्यात 6 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. याचवर्षी 195 प्रकरणे अशी होती ज्यात 12 ते 16 वर्षांच्या मुलींवर बलात्कार झाला. अशा प्रकारच्या 529 प्रकरणांत 16 ते 18 वर्षांच्या मुलींबरोबर अत्याचार करण्यात आला. 2879 प्रकरणे अशी होती जेव्हा 18वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या तरुणींवर बलात्कार करण्यात आला. 


अशी आहे आकडेवारी

55% अत्याचार घर किंवा परिचयाच्या लोकांच्या घरी होतात 
20% बलात्कार हॉस्पिटल, शाळा अशा ठिकाणी होतात 
15% घटना पोलिस ठाण्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर घडतात 
10% बलात्काराचे प्रकार सार्वजनिक ठिकाणी होतात 

 

पुढे वाचा, काही धक्कादायक असे आकडे..

 

 

बातम्या आणखी आहेत...