आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीच्या यमुनामध्ये औद्योगिक कचऱ्यामुळे पांढऱ्या फेसाचा थर साचला आहे. तज्ज्ञ म्हणतात की, औद्योगिक कचऱ्यामुळे यमुनेचा प्रवाह थांबला आहे. एका माहितीनुसार, ही नदी पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे. काही वर्षांपूर्वी या नदीचे काही फोटोजही समोर आले होते. यात महिला छट पूजाही या फेसाळ प्रदूषित पाण्यातच करत होत्या. या पूजेसाठी त्यांना नदीमध्ये कमरेपर्यंत उतरावे लागते, परंतु पाणी एवढे प्रदूषित असूनही महिलांनी या नदीमध्ये पूजा केली होती.
पक्ष्यांची संख्या झाली कमी...
- यमुनेचे प्रदूषण एवढे वाढले आहे की, येथे पक्ष्यांची संख्या तब्बल 80 टक्के घटली आहे.
- हे आकडे आकडे एशियन वॉटर बर्ड-2018 च्या गणनेतून समोर आले आहेत.
- या आकडेवारीनुसार, यमुना परिसरात वजीराबादपासून ते निजामुद्दीनपर्यंत या वर्षी फक्त 594 पक्षी पाहण्यात आले, तर सन 2016 मध्ये येथे पक्ष्यांची संख्या 2640 होती.
- याप्रकारे या वर्षी तब्बल 78 टक्के कमी पक्षी पाहिले गेले.
गतवर्षी 23 तर या वेळी 32 प्रजाती
- त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे, या वर्षी पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये वाढ झाली आहे. या वेही 32 प्रजातींचे पक्षी आढळले. गतवर्षी 23 प्रजातींचे पक्षी आढळले होते.
- या वर्षी 13 प्रजाती पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांच्या, तर 19 हिवाळ्यातील प्रवासी पक्षी आहेत.
- जानेवारीत प्रतिवर्षी एकसाथ एशियाच्या 27 देशांमध्ये पक्ष्यांची संख्या, त्यांच्या प्रजाती व ट्रेंड जाणून घेण्यासाठी एशियन वॉटर बर्ड गणना केली जाते. भारतात 6 ते 21 जानेवारी 2018 पर्यंत गणना करण्यात आली.
2000ची फक्त 99 पर्यंत आली ब्लॅक हेंडेडची संख्या
- दिल्लीत एशियन वॉटर बर्ड गणनेचे कॉर्डिनेटर टी. के. रॉय म्हणाले की, या वेळी यमुना परिसरात पक्ष्यांच्या गणनेत ब्लॅक विंग्ड स्टिल्टची संख्याच 100 च्या पुढे आहे.
- रॉय म्हणाले होते की, गत वर्षी ब्लॅक हेंडेड गुलची संख्या तब्बल 2 हजारच्या आसपास होती, परंतु या वेळी त्यांची संख्या फक्त 99 आहे.
- ते पुढे म्हणाले की, यमुना पूर्णपणे प्रदूषित झाली आहे आणि जलीय जीवनाचे हॅबिटेट वेगाने बिघडत चालले आहे. पक्ष्यांची संख्या घटण्यामागे हेही कारण आहे.
हे पक्षी झाले कमी
यमुनेच्या किनारी आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये रेड वेंटलेड लॅपविंगही सामील आहे. हे प्रवासी पक्षी आहेत, या वर्षी संख्येत कमी नोंदवण्यात आली. आययूसीएन लिस्टमध्ये विलुप्त प्रजाती रिव्हरलापविंगची संख्या गतवर्षाच्या तुलनेत वाढली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रदूषित झालेल्या यमुना नदीचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.