आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने कधीही दारू प्यायली नव्हती, मग त्यांच्या शरीरात गेलीच कशी?- स्वामींनी व्यक्त केला संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
्रीदेवीसोबत झालेल्या घटनाक्रमाचे दुवे जोडण्यात गुंतलेल्या दुबई पोलिसांनी बोनी कपूरची तब्बल 4 तास चौकशी केली. - Divya Marathi
्रीदेवीसोबत झालेल्या घटनाक्रमाचे दुवे जोडण्यात गुंतलेल्या दुबई पोलिसांनी बोनी कपूरची तब्बल 4 तास चौकशी केली.

दुबई - श्रीदेवीच्या मृत्यूवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, श्रीदेवीने कधीही हार्ड लिकर (दारू) प्यायली नव्हती, मग त्यांच्या पोटात गेलीच कशी? त्यांनी असेही म्हटले की, दाऊद इब्राहिमशी सिनेअॅक्ट्रेसेसच्या अवैध संबंधांकडेही पाहायला हवे. तथापि, श्रीदेवीचा रविवारी दुबईत मृत्यू झाला होता. आधी वृत्त आले की, त्यांना कार्डयाक अरेस्ट आला आहे. नंतर फॉरेन्सिक तपासात त्यांचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचे पार्थिव अजूनही भारतात येऊ शकलेले नाही.


त्या फक्त बिअर घेत होत्या
- स्वामी म्हणाले, "प्रॉसिक्यूशनच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी. मीडियात ज्या बाबी येत आहेत त्या खऱ्या वाटत नाहीत.  आम्ही जेवढे तामिळनाडूमध्ये ऐकत होतो की, त्या बिअर सोडून इतर काहीही घेत नाहीत. हॉटेलच्या त्यांच्या खोलीत जाऊन काहीही पाहिले जात नाहीये. सीसीटीव्हीचे काय झाले? डॉक्टर अचानक समोर येतात आणि मीडियाला सांगतात की, त्यांचा मृत्यू हार्ट फेलमुळे झाला आहे." 
- ते असेही म्हणाले की, "सिनेमा अॅक्ट्रेसेसचे जे संबंध आहेत, अवैध संबंध त्यावरही आपण थोडे लक्ष दिले पाहिजे."

 

अमर सिंह म्हणाले होते- कधीच दारू प्यायल्या नाहीत श्रीदेवी
- राज्यसभा खासदार अमर सिंह म्हणाले- श्रीदेवी कधीच दारू प्यायल्या नाहीत. त्यांनी फॉरेंसिक रिपोर्टवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. म्हणाले की, श्रीदेवी कधीही हार्डड्रिंक म्हणजेच दारू प्यायल्या नाहीत. त्या सार्वजनिक जीवन जगणाऱ्या लोकांप्रमाणेच कधी-कधी वाइन घेत होत्या.

 

बोनीची 4 तास चौकशी 
- श्रीदेवीसोबत झालेल्या घटनाक्रमाचे दुवे जोडण्यात गुंतलेल्या दुबई पोलिसांनी बोनी कपूरची तब्बल 4 तास चौकशी केली. त्यांना विचारण्यात आले की, श्रीदेवीशी अखेरच्या वेळी काय-काय बोलणे झाले? कुटुंबातील इतरांशी काय-काय बोलणे झाले? ते मुंबईतून अचानक दुबईला का गेले? श्रीदेवीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्या 3 जण, दोन डॉक्टर आणि 5 कर्मचाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...