आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मृत्यूमुळे या साडी विक्रेत्या कुटुंबाला धक्का, सांगितली ही आठवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवी यांचा गत शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्या दुबईत एका नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. श्रीदेवीने आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर अमिट ठसा उमटवला होता.  आग्रा येथील रहिवासी बबलू बनिया यांच्या कुटुंबाचे श्रीदेवीशी खास नातेसंबंध होते.  DivyaMarathi.Com ला बबलू यांनी या अभिनेत्रीशी निगडित एक किस्सा शेअर केला.

 

मुलगा अर्जुनसाठी आग्राला आली होती श्रीदेवी
- 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अमर सिंह यांच्या प्रचाराच्या निमित्ताने श्रीदेवी या पती बोनी कपूरसह आग्राला आल्या होत्या. तेव्हा त्यांची भेट बबलू बनिया यांच्याशी झाली.
- आग्रामध्ये साड्यांचे दुकान असणारे मुनेंद्र गुप्ता ऊर्फ बबलू बनिया म्हणाले, "श्रीदेवी एका राजकीय कार्यक्रमासाठी आल्या होत्या. इरादत नगर परिसरात पोहोचेपर्यंत त्या खूप थकल्या होत्या. रॅलीदरम्यान त्यांना विश्रांती घेण्यासाठी काही व्यवस्था नव्हती. तेव्हा त्या आमच्या घरी येऊन फ्रेश झाल्या."
- "मला चांगले आठवते की, एप्रिल महिन्याची ती 5 तारीख होती. निवडणुकीच्या प्रचारानंतर ते दोघेही त्यांचा मुलगा अर्जुन कपूरच्या एका चित्रपटासाठी लोकेशन सर्च करत होते."
- पण आता त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने आमच्या सर्व कुटुंबाला धक्का बसला आहे. एवढी प्रतिभाशाली तरीही साधी सरळ अभिनेत्री अचानक निघून गेल्याचे खरे वाटत नाही.


पुढे वाचा-  5-स्टार हॉटेलचे जेवण सोडून खाल्ली होती आलू-टमाट्याची भाजी

बातम्या आणखी आहेत...