आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चेंगराचेगरीत मृत्यू, 4 जखमी; ग्राऊंडवरील प्रवेशावेळी उडाला गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहार मधील रोहतास जिल्ह्यातील लष्कर भरतीवेळी उडालेल्या गोंधळानंतर झालेल्या चेंगारचेंगरीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. अशी माहिती आहे की बुधवारी सकाळी हजारो तरुण आर्मी भरतीसाठी डिहरी येथील बीएमपी टू मैदानाबाहेर जमा झाले होते. भरतीसाठी आलेल्या तरुणांना मैदानात सोडण्यात आले तेव्हा आत जाण्याच्या चढाओढीत तरुण एकमेकांना धक्काबुक्की करत पळत सुटले. तरिुणांच्या धक्काबुक्कीने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेगरी सुरु झाली.

 

रात्रीपासून जमा झाले होते तरुण 
- डिहरी येथील बीएमबी टू मैदानावर 6 ते 18 जानेवारी दरम्यान लष्कर भरती आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी आपला लवकर नंबर लागावा यासाठी खेड्या-पाड्यातून तरुण रात्रीच मैदानाबाहेर जमा झाले होते. 
- बुधवारी सकाळी जेव्हा तरुणांना रांगेत मैदानात सोडले जात होते, तेव्हा एकमेकांच्या पुढे जाण्यामुळे गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की सुरु झाली. काही मुले एकमेकांवर पडली आणि एकच गोंधळ उडाला. 

 

4 जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर 
- पोलिसांनी सांगितले की चेंगारचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव मुकेश कुमार होते. तो आदापूर गावातून लष्करात भरतीसाठी आला होता. 
- जखमींमध्ये श्याम नंदन कुमार, देवव्रत यादव, धर्मेंद्र कुमार यादव आणि विमलेश कुमार यांचा समावेश आहे. हे सर्व गया जिल्ह्यातील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...