आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोदींच्या हत्येचा कट उघड, जाणून घ्या किती कडक असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था.. Story About Indian PM Modis Tight Security Because Of Threat By Naxals

मोदींच्या हत्येचा कट उघड, जाणून घ्या- किती कडक असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलींकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे पंतप्रधानांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसे पाहिले तर मोदींच्या सुरक्षेसाठी आर्मी जवान, कमांडो तैनात असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नेहमी व्यापक प्रमाणावर बंदोबस्त असतो. नेहमीच एवढी कडक सुरक्षाव्यवस्था असते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)चे जवान नेहमी तैनात असतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कशी असते मोदींची सुरक्षा आणि ज्या गाडीने पंतप्रधान चालतात तिची खासियत काय आहे? पंतप्रधान जी गाडी वापरतात ती पंक्चर झाल्यावरही तब्बल 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 320 किमीपर्यँत धावू शकते. 


प्रत्येक स्टेपवर तैनात असतात एसपीजी शूटर
पंतप्रधान जेथे कुठे जातात, तेथे प्रत्येक स्टेपवर एसपीजीचे शूटर तैनात असतात. हे शूटर दहशतवाद्यांना क्षणार्धात कंठस्नान घालू शकतात. एसपीजीमध्ये तब्बल 3 हजार सैनिक आहेत. त्यांची जबाबदारी पंतप्रधानांसोबतच माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची आहे. हे जवान अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसच्या गाइडलाइन्सवर प्रशिक्षित केले जातात.

 

एसपीजी चीफ स्वत: असतात हजर
या जवानांकडे FNF-2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि 17M रिवॉल्वर्स यासोबतच आधुनिक शस्त्रास्त्रे असतात. एसपीजीशिवाय दिल्ली पोलिसही पीएमच्या सिक्योरिटीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. पीएम जर एखाद्या समारंभाला संबोधित करणार असतील तर त्याच्या आधी दिल्ली पोलिस पूर्ण परिसराचे बारकाईने निरीक्षण करते. जोपर्यंत कार्यक्रम असतो तोपर्यंत पूर्ण एरिया एसपीजीच्या जवान आपल्या ताब्यात घेतात. बहुतांश कार्यक्रमांत एसपीजी चीफ स्वत: सुरक्षेत तैनात असतात, जर ते काही कारणाने पोहोचू शकले नाहीत, तर लीड करण्याची जबाबदारी एखाद्या दुसऱ्या वरिष्ठ ऑफिसरकडे दिली जाते.

 

500 कमांडो असतात निवासस्थानी
पीएम जेव्हाही आपल्या निवासस्थानापासून एखाद्या कार्यक्रमासाठी जातात तेव्हा रोडची एका बाजूची ट्रॅफिक 10 मिनिटे आधी रोखली जाते. जवान दुचाकी वाहनाने पूर्ण रूटचे निरीक्षण करतात. उद्देश हाच की, पंतप्रधान ज्या मार्गाने जात आहेत, तो सुरक्षित आहे की नाही. याशिवाय पंतप्रधान निवासस्थान (7, रेसकोर्स रोड) ला एसपीजीच्या 500 हून अधिक कमांडो सुरक्षा देत असतात.

 

ही वाहने असतात ताफ्यात..
पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यात 2 आर्मर्ड बीएमडब्लूय 7 सीरीज सेडान असतात. 6 बीएमडब्ल्यू एक्स 5 आणि 1 मर्सिडीझ बेंझ अॅम्बुलन्स असते. याशिवाय एक डझनहून जास्त वाहने ताफ्यात असतात. शिवाय टाटा सफारी जॅमरसह सामील होते. पीएमच्या रक्षादलात पुढे आणि मागे दिल्ली पोलिस सिक्योरिटी स्टाफच्या गाड्या असतात. याशिवाय उजव्या आणि डाव्या बाजूने दोन आणि व्हेइकल असतात, मधोमध पंतप्रधानांची कार असते. पीएम बीएमडब्लूय 760Li वापरतात. ही बुलेटप्रूफ कार आहे.


जी कार वापरतात मोदी ती पंक्चर झाल्यावरही धावते 90Km च्या स्पीडने, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...  

 

बातम्या आणखी आहेत...