आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची पहिली मिस इंडिया युनिव्हर्स, एका मुलाची आई असूनही जिंकला होता किताब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंद्राणी यांनी स्पर्धेसाठी त्या काळात स्विमसूट परिधान केला होता. हे त्या काळात करणे सोपे नव्हते. - Divya Marathi
इंद्राणी यांनी स्पर्धेसाठी त्या काळात स्विमसूट परिधान केला होता. हे त्या काळात करणे सोपे नव्हते.

नॅशनल डेस्क - तमिळनाडूच्या अनुकृती वासने 2018 साठीची मिस इंडिया वर्ल्ड किताब पटकावला. यंदा ती मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पण सुमारे 66 वर्षांपूर्वी 1952 मध्ये तमिळनाडूच्या इंद्राणी रेहमान पहिल्या मिस इंडिया बनल्या होत्या. त्यावेळी त्या विवाहित आणि एका मुलाच्या आई होत्या. 


चेन्नईमध्ये जन्मलेल्या इंद्राणी यांनी 22 वर्षांच्या असताना मिस इंडिया किताब पटकावला होता. जागतिक स्तरावर होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या मिस इंडिया होत्या. या स्पर्धेसाठी त्यांनी त्याकाळातही स्विमसूट परिधान केला होता. ते त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होते. 


शास्त्रीय नृत्य जगभरात पोहोचवले, अनेक पुरस्कार पटकावले 
इंद्राणी सुंदर तर होत्याच पण त्याचबरोबर भरतनाट्यम, कुचीपुडी, कथकली आणि ओडिशी डान्समध्येही त्या निपुण होत्या. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याला जगभरात ओळख मिळवून दिली. अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. 1969 मध्ये इंद्राणी यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात आला. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी आणि तारकनाथ दास पुरस्कारानेही गौरवण्यात आले. 


अशी होती पर्सनल लाइफ
इंद्राणी यांनी मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये सहभागी गोण्यापूर्वी 1945 मध्येच प्रसिद्ध आर्किटेक्ट हबीब रेहमान यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 15 वर्षे होते. त्यांना एक मुलगीही झाली. तिचे नाव सुकन्या. तरीही त्यांनी करिअर सोडले नाही. मिस इंडिया बनल्यानंतर आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व केल्यानंतर त्यांनी तीन वर्षांनी मुलगा राम रेहमानला जन्म दिला. अखेरच्या काळात त्या न्यूयॉर्कमध्ये होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...