आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची पत्रकारांना मारहाण, गोळीबारही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड - अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिनांचे छायाचित्र हटवण्यावरून शुक्रवारी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आले होते. धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांना मारहाण केली. घटनेच्या व्हिडिआेत दोन वेळा गोळीबार झालेला दिसून आला. धुमश्चक्रीत पत्रकारांना सुरक्षित ठेवण्यात यश आले.

 

गोळीबार कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एखाद्या शिपायाने गोळीबार केला असावा, असा प्रसार माध्यमांचा अंदाज आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिगड प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला.  
एएमयूच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने गुरुवारपासून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जिना यांचे छायाचित्र हटवण्यासाठी बुधवारी कॅम्पसमध्ये घुसलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या लोकांना तत्काळ अटक करण्याची या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. या प्रकरणाची न्यायालयीन तपास केला जायला हवा. तणाव पाहता एएमयूच्या प्रशासनाने पाच दिवसांसाठी तासिका रद्द केल्या आहेत. आंदोलन स्थळापासून काही अंतरावर पोलिस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे एस.डी. महाविद्यालयाचे हिंदुत्ववादी विद्यार्थ्यांनीदेखील सायंकाळी उशिरा रॅली काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना विद्यापीठाकडे जाण्यास रोखले होते.  


भाजप खासदाराच्या पत्रावरून वादाला सुरुवात : भाजपचे खासदार व एएमयू कोर्टचे सदस्य सतीश गौतम यांच्या एका पत्रावरून वादाला सुरुवात झाल्याचे मानले जाते.

 

अलिगडमध्ये इंटरनेट बंद,  शहरात १४४ कलम लागू  
सोशल मीडियावरील अफवांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अलिगडमध्ये शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. जिना प्रकरणाला हवा देणारे सोशल मीडियातील समर्थन व विरोधातील संदेश सातत्याने शेअर केले जात आहेत. त्यामुळे शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...