आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपस्टीकने भिंतीवर लिहिले, बायको आहे मृत्यूला जबाबदार, शेवटची लाइन होती..I L You

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आंचलबरोबर दीपकचा फोटो. - Divya Marathi
पत्नी आंचलबरोबर दीपकचा फोटो.

शाहाबाद (करनाल) - शाहाबादमध्ये 26 वर्षीय तरुणाने घरात मोबाईल चार्जरच्या वायरने गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी खोलीच्या भिंतीवर आणि ड्रेसिंग टेबलच्या आरशावर त्याने लिपस्टीकने सुसाइड नोट लिहिले. त्यात त्याने मृत्यूसाठी पत्नी, साला, सासू आणि भावाच्या पत्नीला जबाबदार ठरवले. पोलिसांनी त्याची आई रमा राणी यांच्या जबाबावरून दीपकची पत्नी आंचल, साला अतुल शर्मा, सासू हर्षलता आणि लहान भावाच्या पत्नीला जबाबदार ठरवले आहे. 


पत्नीला आय लव्ह यू म्हणत केले सुसाइड.. 
- या तरुणाचे नाव आहे, दीपक गोस्वामी. त्याचे लग्न 3 महिन्यांपूर्वी झाले होते. 
- सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजता दीपकने त्याचा भाऊ भूपेंद्र आणि वहिणी हिनाला घराबाहेर काढले आणि गेटवर कुलूप लावून घेतले. त्यानंतर तो स्वतः वरच्या खोलीत निघून गेला. 
- भावाला आणि वहिणीला असे वाटले की, त्याने रागात असे केले. पण त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 
- पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना दीपक चार्जरच्या वायरने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. 

लग्नानंतर काही दिवसांतच सुरू झाला वाद 
- दीपकचे लग्न करनालच्या आंचलबरोबर 31 ऑक्टोबर 2017 ला झाले होते. 
- लग्नानंतर काही दिवसांनंतर पासूनच कुटुंबात वाद व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याची पत्नी आंचल माहेरी निघून गेली. 
- दीपकचे भाऊ आणि वहिणीबरोबर नेहमी वाद व्हायचे असेही सांगितले जाते. 
- शेजाऱ्यांच्या मते त्यांच्यात संपत्तीवरून वाद होता. 


फेसबूकवरही केले पोस्ट 
दीपने मरण्यापूर्वी फेसबूकवरही पोस्ट केली. त्यात त्याने लिहिले, यह सच है, मरना बड़ा मुश्किल है.. कोई भी यह कदम न उठाए, पर मेरे अपनों ने मेरा साथ छोड़ दिया.. मैं हमेशा अकेला था और अकेला रह गया.. मरना नहीं चाहता था लेकिन अपनों ने मजबूर कर दिया.. अतुल शर्मा, हर्ष लता, हिना ने मेरे घर को तोड दिया. आय लव्ह यू आंचल. मेरी बीवी मेरी मौत का कारण है.. अशी पोस्ट त्याने केली.  


वादामुळे 3 दिवस उपाशी होती आई 
- नगरसेवक डॉक्टर सुरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, शनिवारी दीपक त्यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की, त्याची आई रमाराणी यांनी तीन दिवसांपासून जेवण केलेले नाही. त्यावर त्यांनी रमा यांना समाजावले होते. त्यांना असे वाटले की वाद मिटला. त्याच्या दोन तीन दिवसांपूर्वीच दीपकची पत्नी माहेरी निघून गेली होती. 

 

पुढे वाचा, भिंतीवर लिपस्टीकने लिहिलेले सुसाइड नोट..

बातम्या आणखी आहेत...