आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी अग्निवेशना ABVP कार्यकर्त्यांनी बेदम मारले, गोमांसबाबत केले होते वादग्रस्त Statement

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या स्वामी अग्निवेश यांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेदम मारले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांचे कपडेही यावेळी फाडण्यात आले. अग्निवेश पाकुड येथे आयोजित पहाडिया महासम्मेलनासाठी आलेले होते. 


स्वामी अग्निवेश यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. असेच एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. गोमांसा संदर्भात बोलताना अग्निवेश यांनी म्हटले होते की, गोमांस खायला हवे. त्यावर संतापलेल्या भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. स्वामी अग्निवेश थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. त्याचवेळी त्यांनी स्वामी विरोधी घोषणाबाजीही केली. 

 

स्वामी अग्निवेशला मारहाणीनंतर भाजयुमो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर धरणे आंदोलनही केले. ख्रिश्चन मिशनरींच्या इशाऱ्यावर आदिवासींना भडकावण्यासाठी अग्निवेश आले असल्याचे ते म्हणाले. अग्निवेश ख्रिश्चन मिशनरी आणि पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. 


काय म्हणाले अग्निवेश..
याबाबत बोलताना स्वामी अग्निवेश म्हणाले की, त्याठिकाणी पोलिस नव्हते. मी वारंवार बोलावूनही अधिकारी आले नाहीत. अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायचे आहे मला सांगितले होते. मीही सांगितले होते की, आंदोलनाची गरज नाही ते थेट बोलू शकतात. पण तेव्हा कोणीही आले नाही असे अग्निवेश म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...