आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Syrian Artist Paints Love, Murder And Displacement With The Stone Of Mount R \'दगडा\'लाही पाझर फुटायला लावणाऱ्या कलाकृती

हे PHOTOS नि:शब्द तरीही देतात पॉवरफूल मेसेज, \'दगडा\'लाही पाझर फुटायला लावणाऱ्या कलाकृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- दगड, पाषाण, कातळ, खडे, गारगोट्या अशा नानाशब्दांनी आपण उल्लेख करत असतो. आपल्या अवतीभोवती अशा अनेक चीजवस्तू असतात ज्या आपण क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष करत असतो. परंतु कलाकार हे मातीतूनही सोने घडवू शकतात. टाकाऊतून टिकाऊ घडवण्याची किमया कलाकारालाच साधते. अशीच किमया ज्या सिरियाची जगभरात चर्चा होते आहे तेथील एका कलाकाराने साधली आहे. 

 

चितारल्या सिरियातील रहिवाशांच्या वेदना 

> या कलाकृतींमधून त्याने प्रेम, माणसांचे विस्थापन, आप्तस्वकीयांच्या कत्तली आणि अतीव दु:ख दगडांच्या माध्यमातून चितारले आहे. या सिरियन कलाकाराचे नाव आहे Nizar Ali Badr. त्यांच्या कलाकृती इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. जगभरातून त्यांचे कौतुक आणि समर्थनार्थ कॉमेंट्स येत आहेत.  

> त्यांच्या कलाकृतीला पार्श्वभूमी आहे ती धुमसत असलेल्या सिरियन परिस्थितीची. दहशतवादी आणि नंतर देशोदेशीच्या सरकारांकडून होत असलेले तथाकथित हल्ल्यांमुळे सामान्य माणसाचं जीवन कसं पिळवटून निघालं आहे, ते दु:ख यातून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

 

सौजन्य: फेसबुक 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, सिरियन आर्टिस्ट Nizar Ali Badr यांच्या विचार करायला भाग पाडणाऱ्या कलाकृती... 

बातम्या आणखी आहेत...