आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारसाठी घेतले कर्ज अन‌् बनवला तामिळ चित्रपट, मद्रास हायकोर्टाने रोखले प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेन्नईतील वेलाचेरी शाखेतून १३ जणांनी कार खरेदीसाठी ३.२९ कोटींचे कर्ज घेतले. पण कार घेण्याऐवजी या पैशातून त्यांनी एका तामिळ चित्रपटाची निर्मिती केली. घोटाळ्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बँकेने याचिका दाखल केली. मद्रास उच्च न्यायालयाने १६ मार्चपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले. १३ आरोपींमध्ये एक जण कबड्डी खेळाडू आहे. तो व्हाइट स्क्रीन प्रॉडक्शनचे प्रतिनिधित्व करतो.


डी. चित्रा नावाच्या एका कर्ज सल्लागारामार्फत हा घोटाळा झाला. सर्व अर्जदारांची केवायसी कागदपत्रे, चुकीची माहिती, संशयास्पद दस्तऐवज या सल्लागार महिलेनेच बँक अधिकाऱ्यांसमोर सादर केले. त्यानंतर कर्ज मंजूर करण्यासह पैसे जमा करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांचे आयडी पासवर्ड हॅक केले आणि घोटाळा केला. कर्जाची रक्कम कार विक्रेत्यांच्या खात्यावर जमा करण्याऐवजी कर्जदारांच्या खात्यात जमा केली गेली. परंतु या रकमेतून एकही कार खरेदी केली नाही. सर्व रक्कम चित्रपट निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आली.

 

नियमित तपासणी करताना एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाई संबंधात सूचना दिल्या. एसबीआयने याचिका दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सी.व्ही. कार्तिकेयन यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले.

 

कमाईवर बँकेचा हक्क
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. पण कारवाई न झाल्याने बँकेने दिवाणी खटला दाखल केल्याचे याचिकेत म्हटले. चित्रपटाची डीव्हीडी, सॅटेलाइटच्या अधिकारातून होणाऱ्या कमाईवर पहिला अधिकार बँकेचा असणार आहे, असेही यात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...