आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांत्रिकाने 120 महिलांवर जादूटोण्याच्या नावावर केला रेप, प्रत्येक बलात्काराचा शूट करायचा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भूतबाधा दूर करण्याच्या नावावर मांत्रिक बाबा अमरपुरी ऊर्फ बिल्लूने 120 महिलांवर बलात्कार केला. याचा खुलासा एक व्हायरल व्हिडिओ समोर आल्यावर झाला. व्हायरल व्हिडिओत फतेहाबादच्या बालकनाथ मंदिराचा हा पुजारी महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत आहे. पोलिसांनी आरोपी मांत्रिकाला अटक केली आहे. कोर्टापुढे हजर केल्यावर त्याची 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

 

- पोलिस म्हणाले, अमरपुरी बाबा भूतबाधेच्या नावावर महिलांना जाळ्यात अडकवायचा. संमोहन करून तो त्यांना भुलवत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यादरम्यान महिलेला तो गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायचा आणि बलात्काराचा व्हिडिओही शूट करून संग्रही ठेवायचा. मग या व्हिडिओच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल करून मोठी रक्कम वसूल करायचा. अशा महिलांवर पुन्हा पुन्हा रेप करायचा.

 

- चौकशीत अमरपुरीकडून तब्बल 120 व्हिडिओ आढळले आहेत. ज्यात तो महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसत आहे. 120 व्हिडिओ आढळल्याने हे समजत आहे की, तो प्रत्येक महिलेवरील बलात्काराचा व्हिडिओ शूट करून ठेवायचा. त्याच्या खोलीतून गुंगीची औषधे आणि जादूटोण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 9 महिन्यांपूर्वीही त्याला बलात्काराच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...