आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TDP MLA Spent All Night At Crematorium Only To Prove There Is No Such Ghost Things

आमदाराने स्मशानात काढली रात्र; डिनर करून तेथेच काढली झोप, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - आंध्रप्रदेशच्या पालाकोल विधानसभा सीटचे तेदेप आमदार निम्माला रामानायडूने शुक्रवारी अख्खी रात्री स्मशानात काढली आहे. याच ठिकाणी राहून त्यांनी डिनर केले आणि बेड लावून झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर अंघोळ आणि चहा-नाश्ता सुद्धा याच ठिकाणी बसून केला. कारण एवढेच की लोकांच्या मनातून भूताची भीती त्यांना काढायची होती. स्मशानात भूताच्या भितीने कंत्राटदार आणि मजूर येथे काम करण्यास नकार देत होते. 


पालाकोल शहरातील स्मशान गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय वाइट स्थितीत आहे. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. प्रामुख्याने पावसाळ्यात परिस्थिती सर्वात वाइट बनते. या ठिकाणाचे पुनरुत्थान करण्यासाठी याच आमदारांनी पुढाकार घेतला. परंतु, कुठलाही कंत्राटदार किंवा मजूर येथे काम करण्यास तयार झाला नाही. सगळ्यांनी भूत-प्रेतची कारणे दिली. काहींनी तर सुरुवात केल्यानंतर भितीने अर्धवट काम सोडले. त्यामुळेच, गेल्या अनेक दिवसांपासून येथील काम रखडले.


रामानायडू यांनी सांगितल्याप्रमाणे, स्मशानात विकास कामासाठी टेंडर सुद्धा काढण्यात आले होते. परंतु, कामाला सुरुवात होऊ शकली नाही. एखाद्या कंत्राटदाराला विनंती करून कामावर आणले तरीही तो भूताच्या तक्रारी करून काम सोडून जायचा. अशात लोकांना हे सिद्ध करून दाखवणे आवश्यक होते, की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भूत नाही. त्यांच्या मनातून भीती काढण्यासाठी हे सर्व काही केले आहे. रामानायडू यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. सकाळी सर्वच मजूर कामावर परतले आणि बांधकामाला सुरुवात झाली. इतर लोकांच्या मनातील भीती सुद्धा निघून जाईल आणि कामाला गती येईल अशी अपेक्षा या आमदाराने व्यक्त केली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...