आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teacher Couple Sacked On Wedding Day, School Claims Romance Will Affect Students

काश्‍मीरमध्‍ये शिक्षक जोडपे विवाहाच्‍या दिवशीच निलंबित; शाळा म्हणाली, त्‍यांच्‍या रोमान्‍समुळे मुले बिघडतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक जोडप्‍याच्‍या रोमान्‍समुळे मुलांवर चुकीचा परिणाम होईल, असे शाळा प्रशासनाने म्‍हटले आहे. - Divya Marathi
शिक्षक जोडप्‍याच्‍या रोमान्‍समुळे मुलांवर चुकीचा परिणाम होईल, असे शाळा प्रशासनाने म्‍हटले आहे.

श्रीनगर- पुलवामामध्‍ये एका खासगी शाळेतील शिक्षक जोडप्‍याला त्‍यांच्‍या विवाहाच्‍या दिवशीच निलंबित करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या प्रेमप्रकरणातुळे मुलांवर चुकीचा परिणाम होण्‍याची शक्‍यता होती, असे स्‍पष्‍टीकरण कारवाईनंतर शाळा प्रशासनाने दिली आहे. तर या जोडप्‍याने आपली प्रतिमा खराब करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे, असा आरोप शाळेवर लावला आहे.


अनेक वर्षांपासून शाळेत शिकवत होते
- वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनूसार, तारिक भट आणि सुमाया बशीर असे या जोडप्‍याचे नाव आहे. ते दोघेही पुलवामा जिल्‍ह्याचे रहिवासी आहेत. पंपोरमधील मुस्लिम शिक्षण संस्‍थेच्‍या मुल आणि मुलींच्‍या शाखेला ते अनेक वर्षांपासून शिकवत होते.
- जोडप्‍यानी आरोप केला आहे की, 30 नोव्‍हेंबर रोजी त्‍यांचा विवाह होता. मात्र त्‍याच दिवशी शाळेने त्‍यांच्‍यावर निलंबनाची कारवाई केली आहे.


यामुळे काढले शाळेतून
- याप्रकरणी वृत्‍तसंस्‍थेने शाळेच्‍या मुख्‍याधपकांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र तो होऊ शकला नाही. मात्र शाळेचे संचालक बशीर मसुदी यांनी सांगितले आहे की, 'विवाहापूर्वीच ते रोमॅन्‍टीक रिलेशनशिपमध्‍ये होते. त्‍यामुळेच त्‍यांना नौकरीवरुन काढण्‍यात आले.
- त्यांचा शाळेतच रोमान्‍स चालू होता. जे  शाळेतील 2000 विद्यार्थी आणि 200 स्‍टाफसाठी योग्‍य नव्‍हते. याचा विद्यार्थ्‍यांवर चुकीचा परिणाम होऊ शकला असता.


कुटुंबाच्‍या परवानगीनेच केला विवाह
- जोडप्‍याने दावा केला आहे की, त्‍यांनी कुटुंबाच्‍या परवानगीनेच विवाह केला आहे.
- याबद्दल तारिक यांनी सांगितले आहे की, त्‍यांचे अफेअर काही महिन्‍यांपूर्वीच सुरु झाले होते. याबद्दल शाळा प्रशासनाला पूर्ण माहिती होती. त्‍यांच्‍या साखरपूड्यानंतर सुमायाने शाळेतील स्टाफला याची पार्टीही दिली होती.


आमचे म्‍हणणेही ऐकूण घेतले नाही
- यावर जोडप्‍याचे म्‍हणणे आहे की, आम्‍ही कोणतेही पाप किंवा गुन्‍हा केलेला नाही. मात्र शाळा प्रशासन आमची प्रतिमा खराब करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांचा आमच्‍या नात्‍याला विरोध होता तर ज्‍यादिवशी आम्‍ही विवाहाची मागणी केली त्‍याच दिवशी त्‍यांनी आमच्‍याकडून उत्‍तर का नाही मागितले?'
- जोडप्‍याने पुढे म्‍हटले की, 'विवाहासाठी आम्‍ही दोघांनीही एका महिन्‍याची सुट्टी मागितली होती. शाळा प्रशासनाने ती मंजुरही केली. मात्र तेव्‍हाही याबद्दल ते काहीच म्‍हणाले नाही आणि आता अचानक कारवाई केली.'

बातम्या आणखी आहेत...