आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास पाहण्याच्या बहाण्याने स्पर्श करायचा शिक्षक, मॅडम म्हणाल्या,'ते प्रेमाने स्पर्श करतात'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा (बिहार) - विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाच्या अटकेच्या मागणीबाबत गुरुवारी विद्यार्थ्यांच्या पालकांनी राधाराणी कन्या मध्य विद्यालयात गदारोळ आणि तोडफोड केला. शाळेत शिकणाऱ्या 8 व्या वर्गातील विद्यार्थिनींने शिक्षक सत्येंद्र कुमार सिंह यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला आहे. पालकांनी शाळेत ट्रेनिंग देण्यासाठी आलेल्या 2 शिक्षकांना पालकांनी जोरदार मारहाण केली. मुख्याध्यापकांसह इतर महिला शिक्षिकांना बंदीही बनवले. पोलिसांनी मुख्याध्यापिका इंदिरा कुमारी यांना अटक केली आणि शिक्षिका राणी कुमार यांना अटक केली. आरोपी टिचर फरार आहे. 


6 महीने अनेक विद्यार्थिनींबरोबर छेडछाड 
- शाळेतील मॅथ टिचर सत्येंद्र कुमार सिंह हे नेहमीच अभ्यास पाहण्याच्या बहाण्याने 8 व्या वर्गातील विद्यार्थिनींची छेड काढत होते. 
- विद्यार्थिनींनी आरोप केला की, शिक्षक काहीही कारण सांगून बोलवायचा आणि कधी कमरेला तर कधी पाठिवर, गालावर हात लावायचा. 
- मंगळवारी तीन विद्यार्थिनींनी याची तक्रार मुख्याध्यापिकेकडे केली. त्यांनी दुर्लक्ष करत, ते प्रेमाने तसे करतात. त्याचा चुकीचा अर्थ नाही असे सांगितले. 
- विद्यार्थिनींनी पालकांना तक्रार करण्याबाबत सांगितले तर त्यांना धमक्या देण्यात आल्या. 
- गणिताचे शिक्षक 6 महिन्यांपासून असा प्रकार करत असल्याचे 15 ते 20 विद्यार्थिनींने सांगितले. 


अटकेसाठी छापेमारी सुरू 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी सत्येन्द्र कुमार सिंह यांच्या अटकेसाठी छापे मारले जात आहेत. तर राणी नावाच्या शिक्षिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोपी शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...