आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लग्नविधीत लालूपुत्र तेजप्रतापला मेहुणींनी मागितले 1 कोटी, मग एवढ्यात झाली तडजोड Tej Pratap Sister In Laws Demand Crore For Dwar Chhekai Rasm

लग्नविधीत लालूपुत्र तेजप्रतापला मेहुणींनी मागितले 1 कोटी, मग एवढ्यात झाली तडजोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लालू यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रतापच्या मेहुणींनी आपल्या भावजीच्या खिशावर हात साफ केला. जेव्हा तेजप्रताप नवरदेव बनून वऱ्हाडासह सासरवाडीत पोहोचले, तेव्हा द्वार छेकाई विधीच्या नावावर मेहुणींनी 1 कोटी रुपयांची मागणी केली. हे ऐकून तेथे उपस्थित प्रत्येक जण चकित झाला. लहान भाऊ तेजस्वी यादव तेथे होते म्हणून... नाहीतर नवरदेव कंगाल झाला असता. 

 

10 लाखांपेक्षा 1 रुपयाही कमी घेणार नाही...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तेजप्रताप वऱ्हाडासह सासरवाडीत पोहोचले, तेव्हा तेथे द्वार छेकाई विधीसाठी तेथे त्यांच्या मेहुण्या आधीपासून तयारीत होत्या.
- तेवढ्यात नवरी ऐश्वर्या राय यांच्या बहिणींनी आपल्या भावजीला 1 कोटी रुपयांची मागणी केली. एवढे ऐकताच प्रत्येक जण दंग झाला.
- तथापि, भावाची अडचण दूर करण्यासाठी लहान भाऊ तेजस्वी यांनी उडी घेतली. आणि 11 हजार रुपयांपासून बोलणी सुरू केली.
- परंतु तेजप्रतापच्या होणाऱ्या मेहुणींनी 10 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही कमी घेण्यास नकार दिला.
- यादरम्यान दोन्हीकडून समजुतीची बोलणी झाली. आणि शेवटी 50 हजारांत सेटलमेंट झाल्याचे सांगितले जात आहे.

 

माजी CMच्या नात आहेत ऐश्वर्या
- 12 मे रोजी बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि महुआतून आमदार तेजप्रताप यादव यांचे लग्न ऐश्वर्या रायशी झाले.
- ऐश्वर्या या बिहारचे माजी सीएम दरोगा राय यांच्या नात आणि आरजेडी नेते चंद्रिका राय यांच्या कन्या आहेत.
- त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन आणि एमिटी युनिवर्सिटीतून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...