आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता - राव यांची भेट, भाजप-काँग्रेस मुक्त तिसऱ्या आघाडीवर केली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट झाली. या भेटीमध्ये भाजप आणि काँग्रेसमुक्त तिसऱ्या आघाडीविषयी चर्चा झाल्याचे समजतेय. राव यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते की, देशात दर्जेदार राजकारण होणे गरजेचे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नवीन आघाडी स्थापन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. 


ममता राव यांच्या मताशी सहमत 
- आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला दूर ठेवून तिसरी आघाडी बनवण्याच्या राव यांच्या मताला ममता भॅनर्जी यांनी आधीच पाठिंबा दर्शवला होता. 
- ममता यांनी फोनवर राव यांना म्हटले होते की, या मुद्द्यावर मी तुमच्याबरोबर आहे. त्यानंतर या दोघांमध्ये ही भेट ठरली होती. 


भेटीचा अर्थ काय.. 
- 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राव आणि ममता यांच्यातील ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. 
- तज्ज्ञांच्या मते, या बैठकीतून सर्व विरोधी पक्षांच्या आगामी काळात तिसरी आघाडी स्थापन्याबाबतची दिशा ठरवली जाईल. 


यांनीही दर्शवला पाठिंबा.. 
- अरविंद केजरीवाल : केजरीवालांनी फोनवरून पाठिंबा दर्शवल्याचे राव यांनी सांगितले.  
- हेमंत सोरेन : शिबू सोरेन यांचा मुलगा सीएम हेमंत सोरेन यांनीही राव यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. 
- त्याशिवाय छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे  अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे.  


राव यांचा प्रस्ताव.. 
त्रिपुरासह तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर राव यांनी भाजपसह काँग्रेसवर हल्ला चढवला होता. ते म्हणाले, जनता बीजेपीवर नाराज झाली तर राहुलला मत देईल. त्याने देशात काहीही बदलणार नाही. आम्ही अनेक दशके काँग्रेसची सत्ता पाहिली आहे. दोन्ही सरकारांना अपयश आले आहे. देशात दर्जेदार राजकारण होणे गरजेचे आहे. आता तिसऱ्या आघाडीची गरज आहे. त्याचे नेतृत्व करण्यास मी तयार आहे. 


यांचाही मिळू शकतो पाठिंबा 
- शिवसेना, आप, नवीन पटनायक यांचा बीजेडी, लालू यादव यांचा आरजेडी, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, एनडीएतून बाहेर पडलेला टीडीपी, भाकपसह इतर पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळू शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...