आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Terrorist Azhar Masood Trusted Commander Killed In Tral Encounter In Jammu And Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी मसूदचा नीकटवर्तीय कमांडर चकमकीत ठार, डीजीपींनी जारी केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या त्रासमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मारला गेला आहे. या चकमकीत चौघे दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात जैश-ए-मोहम्मदचा शीर्ष कमांडर मुफ्ती यासीरचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांनीच याबाबत ट्वीट करून माहिती दिली. 


पाकिस्तानी मीडियातील फोटो 
- वैद यांनी चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या मुफ्ती यासीरच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी माध्यमांतील काही वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. 
- या फोटोमध्ये मसूद अझहरबरोबर यासिर बंदुकीसह दिसत आहे. त्याच्याबरोबर पाकिस्तानी पोलिसही दिसत आहे. 


आठ तास चालली चकमक 

जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान पथक (एस–जी) आणि सीआरपीएफने मंगळवारी त्रालच्या जंगलांमध्ये एकत्रित कारवाई केली. यादरम्यान सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात आठ तास चकमक झाली. त्यात चार दहशतवादी मारले गेले. या मोहिमेत पोलिस आणि लष्कराचे 2 जवानही शहीद झाले. अझहरला 1999 मध्ये जम्मू जिल्ह्याच्या कोट बलवाल तुरुंगातून सोडवून अफगाणिस्तानच्या कंधहारला नेण्यात आले होते. त्याठिकाणी अपहरण करण्यात आलेल्या भारतीय प्रवाशांच्या मोबदल्यात त्याची सुटका करण्यात आली होती. चकमकीत मारले गेलेले इतर दोन दहशतवादी शेख उमर आणि मुश्ताक अहमद जरगर होते. त्यांनाही त्यावेळी सोडण्यात आले होते. 


दहशतवाद्यांनी लुटली शस्त्रे 
काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिस गार्डवर हल्ला करत पोलिसांची शस्त्रे लुटली. असे सांगितले जात आहे की, दहशतवाद्यांच्या या कृत्यानंतर एक शिपाईदेखिल बेपत्ता आहे. बडगामच्या पाखेरपोरामध्ये तैनात अशलेल्या या शिपायाचे नाव तारिक अहमद भट असून तो पिस्तुलासह मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...