आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला; 1 जवान शहीद, 3 जण जख्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या शिबीरावर हल्ला केला. रात्री उशीरा 1 च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात 1 जवान शहीद झाला. तसेच इतर 3 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चकमक अजुनही सुरू आहे. हा एक आत्मघातकी हल्ला होता असे सांगितले जात आहे.

 

तीन जवांना लागल्या गोळ्या
- शनिवार-रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही दहशतवादी अचानक सीआरपीएफच्या 185 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये घुसले. तसेच जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला.
- अचानक झालेल्या या हल्ल्यात एका जवानाने जागीच हौतात्म्य पत्करले. तसेच 3 जणांना गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सर्वच दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून चकमक अजुनही सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...