आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्पापांचा जीव घेणाऱ्या मद्यपी वाहनचालकांना जामीन नाही; हरियाणा बनवणार कायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत- राज्यात मद्यपान करून वाहन चालवत असताना अपघात झाल्यास व त्यात कुणाचा मृत्यू झाल्यास चालकाला जामीन मिळणार नाही. याबाबतच्या गुन्ह्यांच्या कलमात दुरुस्ती केली जाणार अाहे. ही घाेषणा राज्याचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी बुधवारी विधानसभेत केली. असे झाल्यास हा कायदा करणारे हरियाणा हे देशातील पहिले राज्य असेल, जेथे वाहन चालवताना झालेल्या अपघातप्रकरणी मृत्यूच्या गुन्ह्यात जामीन दिला जाणार नाही. मद्यपानाचे व्यसन राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एसटीएफ गठीत केले जाईल. सरकार मादक पदार्थांच्या विक्रीबाबतही गंभीर असल्याचे शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले. यासह सीमेवर असलेल्या गावांमध्ये व्यसनमुक्ती केंद्रे उघडली जातील, असे अाराेग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितले.