आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीदाला खांदा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमले लोक, दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीदाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक जमले होते. - Divya Marathi
शहीदाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक जमले होते.

आरा (बिहार) - श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले 49व्या बटालियनचे जवान मोहम्मद मोजाहिद खान यांचे पार्थिव बुधवारी त्यांचे मुळ गाव भोजपूर जिल्ह्यातील पीरो गावात आणण्यात आले. पार्थिव शरीर गावात आल्या बरोबर शहीद मोजाहिद अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. शहीदाला श्रद्धांजली देण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. जिल्हा प्रशासनाने देऊ केलेला पाच लाख रुपयांचा चेक शहीदाच्या भावाने परत केला. 

 

शहीदाच्या कुटुंबियांनी परत केले 5 लाख रुपये 
- शहीद मोजाहिद यांच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाने दिलेला पाच लाख रुपयांचा चेक परत केला आहे. शहीद मोजाहिद यांचे बंधू म्हणाले, माझा भाऊ काही दारू प्याल्याने मेलेला नाही, ज्यामुळे बिहार सरकार पाच लाख रुपये मदत निधी देत आहे. तो देशासाठी शहीद झाला आहे. 

पडाव मैदाना झाली 'जनाजे की नमाज' 
- शहीदाला सुपुर्द-ए-खाक करण्यापूर्वी स्थानिक पडाव मैदानावर 'जनाजे की नमाज' पठण झाले. 
- पाटणा रेंजचे सीआरपीएफचे डीआयजी मो. के. सजनुद्दीन आणि कमांडेट भूपेश यादव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी शहीदाला श्रद्धांजली वाहिली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हजारोच्या संख्येने आले होते लोक...

बातम्या आणखी आहेत...