आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाणेरड्या पाण्यामुळे कोणी फिरकतही नव्हते, आता त्याच भागात देशाची पहिली तरंगती बाजारपेठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता- कोलकात्यातील पतौली सरोवर... वर्षभरापूर्वी येथील गटारगंगेमुळे कोणी तेथे फिरकतही नव्हते. आता मात्र चित्र बदलले आहे. आजूबाजूच्या दुकानांचे अतिक्रमण काढले आहे. बेरोजगार दुकानदारांसाठी सरकारने उपाय शाेधत त्याच ठिकाणी तरंगती बाजारपेठ सुरू केली आहे. येथे रोज सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत लोक जीवनावश्यक साहित्य खरेदी करतात. या बाजारपेठेत ११४ नौकांवर २२८ दुकाने आहेत. एका नावेवर दोन दुकाने आहेत. बाजारपेठेच्या मधोमध एक रस्ता तयार केला आहे. बाजारपेठ वसवण्यासाठी १० कोटी रुपये खर्च आला. ही ५०० मीटर लांब व ६० मीटर रुंद आहे. २५ जानेवारीला सुरू झालेल्या बाजारपेठेत प्रवेश मोफत आहे.  


खरेदीसोबत फिरण्याची व सेल्फी काढण्याची क्रेझ  
कोलकात्यातील तरंगती बाजारपेठ प्रसिद्ध झाली आहे. येथील भाजी विक्रेते सनातन दास म्हणाले, लोक सामान खरेदी करण्यासाठी येतात. त्याआधी ते छायाचित्र व सेल्फीचे काम उरकतात.  


ही आशियातील तिसरी तरंगती बाजारपेठ  
आशियात थायलंडच्या बँकाॅक व सिंगापूरमध्येही तरंगती बाजारपेठ आहे. पतौली बाजारपेठ याच मॉडेलवर साकारली आहे. श्रीनगरच्या दल सरोवरातही अशीच बाजारपेठ आहे. मात्र, ती वसवलेली नाही.  


दररोज ४ ते ५ हजार लोक बाजारपेठेत येतात  
कोलकात्याच्या पतौली बाजारपेठेत रोज ४ ते ५ हजार लोक येतात. या बाजारात भाजी, मासळी, मटण व किराणा साहित्यासह चहा, कपडे, रजई, नाष्टा, सलून आदींची दुकाने आहेत.

बातम्या आणखी आहेत...