आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआप्रकरणी साक्षीदारांना सुरक्षा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टाने मागणी फेटाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन साक्षीदारांना सुरक्षा देण्यास आणि या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. या प्रकरणाची चौकशी जम्मू-काश्मीर पोलिसांची गुन्हे शाखाच करेल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

 

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या विशाल जंगोत्रा याच्या बाजूने साक्ष देणाऱ्या साहिल, सचिन आणि नीरज शर्मा या तीन मित्रांनी ही याचिका दाखल केली होती. तीत त्यांनी पोलिसांच्या छळापासून आपली सुटका करावी, आपल्याला सुरक्षा देण्यात यावी आणि या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. हे तिघेही जम्मूचे राहणारे आहेत आणि ते उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या कृषी महाविद्यालयात विशाल जंगोत्रासोबत शिकत आहेत. राज्य पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी १९ ते ३१ मार्चदरम्यान शारीरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप या तिन्ही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...