आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे कामकाज समजून घेण्यासाठी 27 तरुण एका दिवसासाठी बनले जिल्हाधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- तरुणांना जिल्हा प्रशासनाच्या कामाची माहिती व्हावी म्हणून छत्तीसगड सरकारने अभिनव प्रयोग सुरू केला. याअंतर्गत २७ जिल्ह्यांमध्ये २७ तरुण एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनले. ५१९ महाविद्यालयांत ‘यूथ स्पार्क’ स्पर्धा घेऊन ५ लाख तरुणांमधून तरुणांची निवड झाली.


छत्तीसगडमध्ये भाजपला १४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. रायपूरपासून बस्तरपर्यंतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जागी तरुणांना बसवले होते. जिल्हाधिकारी पदावर कसे काम चालते, निर्णय कसे घेतले जातात याची माहिती तरुणांना समजावून सांगितली. दिवसभराच्या कामकाजाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवला असून याच्या आधारावर १२ जानेवारीला ३ स्पर्धकांचा सन्मान केला जाईल.   


दीप्ती म्हणाली, नाही होणार कलेक्टर 
स्थापत्य अभियांत्रिकीची सरगुजा येथील दीप्ती मैत्रिणीची स्कूटी घेऊन जगदलपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. जिल्हाधिकारी धनंजय देवांगण यांच्यासोबत स्वामी अवधेशानंद यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेली. अभियांत्रिकी क्षेत्रात आनंदी असल्याचे ती म्हणाली.  


संदीप म्हणाला, जनजागृती करणार 
संदीप द्विवेदीला घेण्यासाठी कांकेरचे जिल्हाधिकारी टामनसिंह सोनवाणी शासकीय वाहन पाठवणार होते. पण समस्या जाणण्यासाठी तो सायकलवर आला. दिवसभराच्या कामानंतर त्याने प्रशासन ढिम्म असल्याचे सांगत जिल्हाधिकारी झाल्यास जनजागृती करू, असे म्हटले.


स्टार्टअप्स सुरू करून नोकऱ्या देऊ
बी.कॉम. प्रथम वर्षाचा विद्यार्थी प्रशांत जांघेल रेल्वेच्या जनरल कोचमध्ये जांजगीर-चांपाला पोहोचला. ऑटोने जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बसला. अधिकारी एका मर्यादेत काम करत असल्याने जिल्हाधिकारी बनण्याऐवजी स्टार्टअप सुरू करून नोकऱ्या देणार असल्याचे त्याने सांगितले.  


बिलासपूरमध्ये कोणी स्वागत केले नाही 
चेतना देवांगणच्या स्वागतासाठी कोणीही पुढे आले नाही. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारील खुर्चीवरही बसू दिले नाही. बैठकीत काही प्रश्नही विचारता आले नाही. परंतु बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिला कामकाज समजावून सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...