आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युको बँकेच्या 35 लॉकरमधून 10 कोटींचे सामान गायब, पोलिसांना मॅनेजमेंटवर संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी यापूर्वी सुरक्षाव्यवस्थेवर 4 वेळा प्रश्न उपस्थित केले होते. येथील खिडकीही मजबूत नव्हती. - Divya Marathi
पोलिसांनी यापूर्वी सुरक्षाव्यवस्थेवर 4 वेळा प्रश्न उपस्थित केले होते. येथील खिडकीही मजबूत नव्हती.

- बँकेत एकूण 72 लॉकर होते. त्यापैकी 35 गॅस कटरच्या मदतीने कापण्यात आले. घटनास्थळी दोन गॅसकटरही मिळाले आहेत. 

- पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना या घटनेची माहिती बँकेऐवजी माध्यमांकडून मिळाली. 

 

पूर्णिया - शहरात महिला कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या युको बँकेचे 72 पैकी 35 लॉकर कापून सर्व सामान गायब करण्यात आले आहे. या लॉकरमध्ये जवळपास 10 कोटींचा ऐवज होता असे सांगितले जात आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी हा चोरीचा प्रकार असल्याचे सांगत आहेत. पण त्यांच्या वेगवेगळ्या जबाबांमुळे घटनेबाबत संशय निर्माण झाला असून, प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. 


1:30 वाजता समजले, 3 वाजता पोलिसांना मिळाली माहिती 
शनिवारी बँकेला सुट्टी होती. त्यामुळे स्टाफ आलेला नव्हता. रविवारी भागलपूरहून आलेल्या ऑडिट टीमबरोबर दुपारी 1:30 वाजता मॅनेजर सुमित कुमार बँकेत पोहोचले तेव्हा त्यांना खिडकी तुटलेली दिसली. सामान सगळीकडे विखुरलेले होते. 72 पैकी 35 गॅसकटरने कापण्यात आले होते. त्याठिकाणी दोन गॅस कटरही आढळले. 


वेगवेगळे जबाब 
- पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, त्यांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका माध्यम प्रतिनिधीकडून या घटनेबाबत माहिती मिळाली. दुपारी तीन वाजता त्यांना याबाबत समजले. 
- त्यामुळे बँक मॅनेजर सुमित यांना दुपारी 1:30 वाजता घटना समजली तर त्यांनी तेव्हाच पोलिसांना का माहिती दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
- असिस्टंट ब्रँच मॅनेजर पुजा वर्मा यांनी सांगितले की, ब्रँच मॅनेजरने सांगितल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 


सूचना देऊनही गार्ड तैनात केले नाही 
ही बँक निर्जन बागामध्ये होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी बँक मॅनेजरला रात्रीच्या वेळी गार्ड तैनात करण्याच्या सूचना दोन वेळा केल्या होत्या. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याठिकाणी कॅम्पसमध्ये फक्त तीन गार्ड तैनात करण्यात आले होते. त्यांच्यावर बँकेच्या सुरक्षेची जबाबदारी नव्हती. 


सायरनही वाजला नाही 
पोलिसांना अशाही संशय आहे की, पोलिस खिडकीतून आत आले. आत ते जवळपास 5 तास राहिले अशी शक्यता आहे. तसे असेल तर सायरन का वाजला नाही, हा संशय पोलिसांना आहे. सायरन वाजला असता तर कॅम्पसमधील सुरक्षारक्षक धावत आले असते. चोर सीसीटीव्हीची हार्डडिस्कही सोबत घेऊन गेले. 


नुकसान भरपाई देण्यास बँक बांधील नाही 
- वार्षिक भाड्याच्या मोबदल्यात बँका ग्राहकांना लॉकर उपलब्ध करून देतात. त्याची एक किल्ली बँकेकडे असते तर दुसरी ग्राहकाकडे. किल्ली लावल्यानंतर कोणीही अधिकारी तेथे उपस्थित नसतो. 
- बँक ग्राहकांना हे विचारत नाही की, ते लॉकरचा वापर काय ठेवण्यासाठी करणार आहेत. ग्राहकाला हवे ते त्यात ठेवता येते. पण सामान हरवल्यास किंवा चोरी झाल्यास बँक नुकसान भरपाई देण्यास बांधील नसते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...