Home | National | Other State | these 5 baba goes to jail in sex racket

महिलांवर अत्याचार, सेेक्स रॅकेट प्रकरणात या 5 बाबांनाही खावी लागली तुरुंगाची हवा..

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Apr 26, 2018, 05:25 AM IST

नित्यानंदच्या २०१० मध्ये आलेल्या एका सेक्स सीडीने एवढा गोंधळ झाला की त्याचे सिंहासन हादरले.

 • these 5 baba goes to jail in sex racket
  स्वामी नित्यानंद

  1) स्वामी नित्यानंद
  नित्यानंदच्या २०१० मध्ये आलेल्या एका सेक्स सीडीने एवढा गोंधळ झाला की त्याचे सिंहासन हादरले. सीडीत नित्यानंद हा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रीशी शारीरिक संबंध करत असल्याचे दाखवले होते. फॉरेन्सिक लॅबच्या चौकशीत सीडी खरी आढळली. नित्यानंदची २०१४ ला बंगळुरूच्या रुग्णालयात पुरुषत्व चाचणी झाली. २०१० मध्ये नित्यानंद या प्रकरणी ५२ दिवस तुरुंगात राहिला.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर बाबांविषयी...

 • these 5 baba goes to jail in sex racket

  गुरमीत रामरहीम सिंह
  डेरा सच्चा सौदाचा गुरमीत रामरहीम स्वत:ला देवाचा संदेशवाहक सांगत असे. गेल्या वर्षी हरियाणाच्या विशेष सीबीआय कोर्टाने अाश्रमाच्या २ मुलींशी अत्याचाराच्या प्रकरणात त्याला १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुलींनी सांगितले की, रामरहीम आमच्यावर आणि इतर महिलांवर आपल्या गुहेत अत्याचार करत होता. रामरहीम रोहतक तुरुंगात आहे.  

 • these 5 baba goes to jail in sex racket

  भीमानंद महाराज  
  दिल्लीत पकडलेला इच्छाधारी बाबा ऊर्फ संत भीमानंद महाराजाचे खरे नाव शिवमूरत द्विवेदी आहे. १२ वर्षांतच त्याने कोट्यवधींची संपत्ती जमा केली. तो चित्रकूटमध्ये प्रवचनाच्या आडून सेक्स रॅकेट चालवत होता. स्वयंभू बाबाला कथितरीत्या वेश्या व्यवसाय चालवण्याच्या आराेपावरून मकोकाअंतर्गत अटकही झाली होती. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली होती.

 • these 5 baba goes to jail in sex racket

  रामपाल  
  रामपाल हरियाणाच्या पाटबंधारे विभागात अभियंता होता. १८ वर्षांच्या नोकरीनंतर त्याने राजीनामा दिला आणि नंतर सत्संग करू लागला. त्याच्या आश्रमाच्या रुग्णालयात गर्भपात सेंटर चालवत होता. आश्रमातून शस्त्रे आणि अनेक आक्षेपार्ह औषधे जप्त केली होती. त्याच्या आश्रमात महिलांच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले होते. रामपाल देशद्रोहाच्या प्रकरणात सध्या हिसार तुरुंगात आहे.  

 • these 5 baba goes to jail in sex racket

  चंद्रास्वामी  
  चंद्रास्वामीला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह रावांचा सल्लागार मानले जात होते. त्याच्यावर राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोपही झाला. १९९६ मध्ये चंद्रास्वामीला अटकही झाली होती. अनेक देशांच्या शासनप्रमुखांशी संबंध, शस्त्रास्त्रांची दलाली आणि हवालासारख्या व्यवसायाचे आरोप लागले. शिष्यांत ब्रिटिश पीएम मार्गारेट थॅचरही होत्या.  

 • these 5 baba goes to jail in sex racket
  आसाराम

  आसाराम १६९६ दिवसांपासून तुरुंगात. ऑगस्ट २०१३ मध्ये आश्रमात अत्याचार केला होता.  

Trending