आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींच्या जीवाला मोठा धोका, सुरक्षेत वाढ; कुणीच भेदू शकणार नाही हे कवच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात एसपीजी (Special Protection Group) ने एक महत्वाची बैठक घेऊन पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच या बैठकीत पीएम मोदींच्या सुरक्षेत काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पीएम नरेंद्र मोदी यांना नक्षलवाद्यांकडून नुकतीच जिवे मारण्याची धमकी मिळाली. त्यानंतर घडलेल्या एका घटनेनंतर हा बदल अत्यावश्यक मानण्यात आला आहे. 


आताच बदल का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पश्चिम बंगाल दौरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 7 स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तरीही एक व्यक्ती ते 7 चे 7 सुरक्षा स्तर भेदून मोदींचे चरण स्पर्श करण्यात यशस्वी ठरली होती. त्यामुळेच, एसपीजीने महत्वाची बैठक घेऊन काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसपीजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वच सदस्यांना यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. ते नियम आणि बदल कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती आम्ही घेऊन आलो आहे. 


क्लोझ प्रोटेक्शन ग्रुपवर सर्वाधिक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक सभेत किंवा रोड शोमध्ये सहभागी होतात त्यावेळी त्यांच्या भोवती 4 ते 5 सुरक्षा रक्षक असतात. तीच विशेष ट्रेनिंग घेतलेल्या एलीट कमांडोजची क्लोझ प्रोटेक्शन टीम आहे. त्यावर यापुढे सर्वात जास्त लक्ष दिले जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणीही पंतप्रधानांच्या क्लोझ प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा भेदू शकणार नाही अशी व्यवस्था केली जाणार आहे. 


राजीव गांधी हत्याकांडावरून धडा...
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या क्लोझ प्रोटेक्शन ग्रुप किंवा टीमची सुरक्षा भेदल्यानंतरच झाली होती. राजीव गांधी यांची हत्या सार्वजनिक कार्यक्रमात ह्युमन कॉन्टॅक्टने झाली होती. अर्थातच पीएम मोदींचे क्लोझ प्रोटेक्शन टीम स्तर इतके मजबूत केले जाईल की कुणीच या घेऱ्यात प्रवेश करू शकणार नाही. 


नियोजित रोड शोंची सुरक्षा चोख
रोड शो नियोजित असल्यास त्याची माहिती सार्वजनिक होत असते. सामान्य नागरिकांसह दहशतवाद्यांना सुद्धा अशा कार्यक्रमांची माहिती सहज उपलब्ध होते. ते अशा रोड शोंवर हल्ल्याची प्लॅनिंग करू शकतात. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित रोड शोवर सुरक्षा रक्षकांचे विशेष लक्ष राहणार आहे. रोड शो असल्याच्या ठिकाणी डीजीपींना सतर्क केले जाईल. एसपीजी आणि कमांडोंसह पोलिसांना तेथील संरक्षणाची जबाबदारी दिली जाईल. 


आवश्यक असेल तरच नेते, अधिकाऱ्यांना परवानगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी सुद्धा मंत्री, अधिकारी आणि नेत्यांना वैध कारण द्यावे लागणार आहे. आवश्यक न वाटल्यास त्यांना मोदींची भेट घेता येणार नाही. सार्वजनिक सभा आणि रोडशोंमध्ये विविध ठिकाणी स्थानिक नेते आणि अधिकारी मोदींची भेट घेण्यासाठी गर्दी करतात. यापुढे, त्यांना सुद्धा 


विशेष लक्ष दिले जाणार ते क्लोझ प्रोटेक्शन टीमला
पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी जात असताना त्यांच्या अगदी जवळ असलेले 4-5 सुरक्षा रक्षक हे एलीट कमांडो असतात. याच टीमवर सर्वाधिक लक्ष घातले जाणार आहे. या टीमच्या घेऱ्याला कुणीच भेदू शकणार नाही अशी व्यवस्था केली जाणार आहे. क्लोझ प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा भेदून प्रवेश करता येणार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...