आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याचे डॉक्टर हर्षद यांच्यासह एम्सच्या तिघांचा अपघाती मृत्यू, टँकरमध्ये घुसली कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा- उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना जलदगती महामार्गावर रविवारी कँटर व कारच्या धडकेत दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांत दोन महिला डॉक्टरांचाही समावेश आहे. हा अपघात सुरीर भागात घडला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. जखमींना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले, दिल्ली एम्समधील ७ डॉक्टर्स वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीहून  आग्रा येथे जात होते. दरम्यान, त्यांच्या कारला अपघात झाला.  डॉ. हर्षद, डॉ. यशप्रीत व डॉ. हेमबाला हे जागीच ठार झाले.  


रोडवेज बस यमुना मार्गावरून खाली कोसळली  २ ठार
ग्रेटर नोएडाच्या दनकौर भागात रोडवेजची बस यमुना महामार्गावरून खाली कोसळली. यात दोन जण ठार तर २३ जखमी झाले आहेत. जखमीत चार मुले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...