आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मित्राकडून महिलेवर गँगरेप, तुरुंगातील पतीला सोडवण्यासाठी करणार होता मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद (बिहार) - पतीवर सुरू असलेल्या खटल्यात मदत करण्याच्या बहाण्याने एका तरुणाने त्याच्या मित्राच्या पत्नीशी ओळख वाढवली. नंतर तिला सोडण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवून नेले आणि बळजबरी एका घरात नेऊ बंद केले. पिस्तुलाचा धाक दाखवत मित्रांच्या मदतीने त्याने महिलेवर गँगरेप केला. 


गेल्या महिन्यात घडला प्रकार... 
- हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. पण लाजेखातर महिलेने सर्वांपासून हे प्रकरण लपवले होते. 
- पतीने महिलेची विचारपूस केली त्यावेळी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. महिला छत्तीसगची आहे. 
- या महिलेचा पती दरोड्याच्या प्रकरणात अटकेत होता. ही महिला मधे मधे पतीला भेटायला येत होती. 
- त्याचदरम्यान 19 मेला कोर्टात मुख्य आरोपी विकासने महिलेच्या पतीचे नाव घेऊन तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला सोडण्याच्या बहाण्याने नेत तिच्यावर मित्रांसह सामुहिक बलात्कार केला. 
- शुक्रवारी महिलेच्या पतीने याबाबत अर्ज करत कारवाईची मागणी केली. 


पतीबरोबर तुरुंगात होता आरोपी 
- महिलेचा पती आणि आरोपी दोघे तुरुंगात सोबत कैदेत होते. 
- महिलेने सांगितले की, ती 19 मे रोजी औरंगाबाद कोर्टात वकिलांना भेटायला आली होती. विकासही तेव्हा कोर्टात होता. 
- महिलेला पाहताच तो बोलू लागला. तिच्या पतीने त्याला तुरुंगाबाहेर काढण्यासाठी पत्नीची मदत कर असे मला सांगितल्याचे आरोपी तिला म्हणाला. त्यानंतर महिला गावी जाण्यासाठी निघाली तेव्हा बसस्टँडपर्यंत सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला गाडीवर बसवले. 
- त्यानंतर तो स्टँडवर न जाता थेट शाहपूर परिसरात गेला. त्याठिकाणी तिला त्याने डांबले. 


पिस्तुलाने धमकावर केला गँगरेप...
- संध्याकाळनंतर विकास कमलेश आणि मणिकर्म या त्याच्या दोन मित्रांसह परतला. त्या तिघांनी हॉटेलमधून आणलेले जेवण आधी तिला खाऊ घातले आणि नंतर बळजबरी करू लागले. 
- जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने पिस्तुल काढले आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यानंतर तिचे हात बांधून तिघांनी तिच्यावर गँगरेप केला. 
- महिला घरी असलेल्या तिच्या दीड वर्षाच्या मुलीसाठी सोडण्याची विनंती करू लागली. पण कोणीही तिचे काहीही ऐकले नाही. नंतर महिलेला तीन रात्रभर कोंडून ते सर्व निघून गेले. 


पतीने केली पत्नीची विचारपूस.. 
- घटनेच्या 10 दिवसांनी म्हणजे 30 मे रोजी तुरुंगातून सुटल्यानंतर पीडितेचा पती रामानुजगंज घरी पोहोचला. त्याठिकाणी त्याला समजले की, 19 मे  रोजी त्याची पत्नी घरी परतलीच नव्हती. 
- महिला भितीने काहीही बोलत नव्हती. पण जेव्हा पतीने तिला वारंवार विचारले तेव्हा तिने रडत संपूर्ण प्रकार सांगितला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...