आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी लुटीसाठी वृद्धाची हत्या केली, नंतर नराधमाने एका चिमुकलीसोबत केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - शहराच्या संस्कारांवर कलंक लवाणारी एक घटना मंगळवारी समोर आली, यात एका व्यक्तीने लुटीच्या उद्देशाने वृद्धाची हत्या केली, नंतर 3 वर्षाच्या चिमकुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कारकरून तिची देखील हत्या केली. आरोपीने गुन्हा कबुल केला तेव्हा, पोलिस देखील आश्चर्यचकीत झाले. हे दोन्ही गुन्हे आरोपीने 48 तासाच्या आत केले होते. 


प्रेस कान्फरंसमध्य सर्वजण आश्चर्यचकीत...
4 दिवसांपूर्वी एका वृद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या दरम्यान भवानगर रोडवर एका मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. तिच्यावर बलात्कार झाला होता. पोलिसांनी या दिशेने तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चौकशी सुरू केली. तेव्हा कळाले की, वृद्धाची आणि मुलीची हत्या एकाच प्रकारे करण्यात आली आहे. दोन्ही हत्यांमध्ये साधर्म्य आढळल्याने पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा त्याने दोन्ही हत्या आपणच केल्याचे कबुल केले. हे ऐकून पोलिस देखील चकित झाले. आरोपीचे नाव महेश आहे. तो कालावड येथील राहिवाशी असून त्याला बहीन आणि बायको आहे. पत्नीने सोडून दिल्यानंतर तो राजकोट येथे राहत होता.


हत्येचा घटनाक्रम...
- 7 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता पारबाजारजवळ कृष्णपूरामध्ये राहणाऱ्या अस्माबेन हातिमाभाई सादिकोट (70)ला रमेशने लुटले आणि तिची हत्या केली.
- 8 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता रमेश अमूल सर्कलजवळ पोहोचला. तेथून श्रमजीवी कुटुंबातील मुलीला जुन्या पीटीसी मैदानावर नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला, नंतर तिची हत्या केली.
- 9 फेब्रुवारीला भागोणे येथे मालियाणककडे हायवेवर आस्माबेनचा मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आला.
- 10 फेब्रुवारीला 11 वाजाता वृद्धाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी रमेशला अटक केली.
- 11 फेब्रुवारीला पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नवी टीम बनवून ज्या ठिकाणी हत्या झाल्या त्याच्या आसपासच्या परिसरता आपल्या गुप्तहेरांना पाठवले आणि तेथिल सीसीटीव्ही तपासने सुरू केले.
- 12 फेब्रुवारीला एक संशयीत व्यक्ती एका रिक्षात मुलीला बसवून नेताना दिसला.
- 13 फेब्रुवारीला रिक्षात बसलेल्या व्यक्तीच्या हातात कडे पहिले, वृद्धाची हत्या करणाऱ्या रमेशने देखील तसेच कडे घातलेले होते. वृद्धाची हत्या वजनदार दकडाने करण्यात आली होती, त्याच पद्धतीने मुलीची हत्या करण्यात आली होती. यावरून पोलिसांनी रमेशची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने दोन्ही हत्या केल्याचे कबूल केले.
- पोलिसांनी रमेशविरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा नोदंवला आहे. आता रमेशची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. मुलीच्या शरिरावरील डाग आणि आरोपीचे सॅम्पल घेण्यात येईल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...