आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Beaten Dowry Case And Physical Violence Case Registered Against Husband Family In Panipat

Dowry साठी पती, दीर सासऱ्याने शेतात बांधून दिल्या अमानवीय यातना; पोलिसांसमोरच मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत - हरियाणातील पानीपत जिल्ह्यात एका तरुणीला पती, दीर, सासू आणि सासऱ्यांनी हुंड्यासाठी 28 तास शेतात बांधून ठेवले. या 28 तासांत त्यांनी या तरुणीला बेदम मारहाण करून अमानवीय यातना दिल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलिस पोहोचले, तेव्हा पोलिसांसमोरच त्या क्रूरकर्मांनी त्या महिलेला पुन्हा मारहाण सुरू केली. पोलिसांनी तिची सुटका करून रुग्णालयात भरती केले. पोलिसांसमोरच महिलेला झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. 


महिलेच्या तक्रारीनंतर एफआयआर...
पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती, मोठा दीर, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यातील पती फरार असून इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. आलदोका गावाताली रहिवासी नरेंद्र यांच्या मुलीनेच पोलिसांत ही तक्रार दाखल केली. 2009 मध्ये तिचा विवाह होडल गावातील संजयसोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच सासरच्या मंडळीने तिचा छळ सुरू केला. तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा या लोकांवर काहीच उपयोग झाला नाही.


दीर पोलिस अधिकारी...
पीडित महिलेवर अत्याचार करणारा मोठा दीर हरियाणा पोलिसांत आहे. त्याने आपला भाऊ आणि आई-वडिलांसोबत मिळून आपल्या भावजयीला शेतात झाडाला बांधले. 28 तास या महिलेला झाडाशी बांधून तिला मारहाण करण्यात आली. पीडितेने लावलेल्या आरोपानुसार, तिचा सासरा रणसिंह याने तिची छेड काढली. विरोध करताच तो शिवीगाळ करायला लागला. कित्येक तास या लोकांनी वेठीस धरल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी बाहेर पडण्यास यशस्वी ठरली. त्याचवेळी तिने 1019 या महिला हेल्पलाइनला फोन लावला.

 

बातम्या आणखी आहेत...