आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • एम.एफ. हुसेन यांच्या 10 वादग्रस्‍त पेंटिंग्ज: ज्यामुळे त्यांनी सोडला भारत Top 10 Controversial Paintings Of MF Hussain Death Anniversary Special Story

10 वादग्रस्‍त पेंटिंग्ज: ज्यामुळे या चित्रकाराने सोडला भारत, आयुष्यातील अखेरचा काळ देशाबाहेर घालवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन - Divya Marathi
दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन

स्पेशल डेस्क - मकबूल फिदा हुसैन म्हणजेच एम. एफ. हुसेन हे आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे भारतीय चित्रकार होते. भारताचे पिकासो म्हणून ख्यात असलेल्या हुसेन यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1915 रोजी महाराष्‍ट्रातील पंढरपूरमध्‍ये झाला होता. तर 9 जून 2011 रोजी त्‍यांचे लंडन येथे निधन झाले. 

हुसेन यांच्‍या चित्रांवर प्रेम करणार्‍या चाहत्‍यांचा वर्ग खूप मोठा आहे. तरी त्‍यांचे कित्‍येक चित्र हे लोकांना समजतही नव्‍हते. काही चित्रांमुळे ते प्रचंड वादात सापडले होते. त्‍यांना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण या पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आले आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला हुसेन यांचे काही वादग्रस्‍त चित्रे दाखवत आहोत.

 

भारतमातेचे नग्‍न चित्र...
2006 मध्‍ये इंडिया टुडे या मासिकाच्‍या कव्‍हर पेजवर भारत मातेचे नग्‍न चित्र प्रकाशित झाल्‍याने हुसेन यांच्‍यावर टीका झाली होती. या चित्रामध्‍ये एका नग्‍न युवतीचे चित्र होते नि तिच्‍या मागे भारताचा नकाशा होता. नग्‍न युवतीच्‍या शरीरावर भारतातील राज्‍यांची नावे होती. हिंदू जागृती समिति आणि विश्व हिंदू परिषदेने हे चित्र अश्‍लील असल्‍याचे म्‍हणत हुसेन यांच्‍यावर जोरदार हल्‍ला चढवला होता.

 

हिंदु देवतांचे अश्‍लील चित्र काढल्‍याचा आरोप...
काही हिन्‍दू संघटनांनी हुसेन यांच्‍यावर आरोप केला होता की, त्‍यांनी मां दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती मातेचे नग्‍न चित्र बनवले. त्‍यानंतर हुसेन यांना कठोर टीकेला सामोरे जावे लागले. त्‍यांनी 1970 मध्‍ये ही पेंटिंग तयार केली होती. पण ही पेंटिंग 'विचार मीमांसा' नावाच्‍या मासिकावर 1996 मध्‍ये प्रकाशित झाली होती. 'मकबूल फिदा हुसेन-पेंटर की कसाई' या शिर्षकाखाली हे चित्र मासिकात प्रकाशित झाले होते. 1998 मध्‍ये काही हिन्‍दू संघटनांनी हुसेन यांच्‍या घरावर हल्‍ला केला होता.

 

अखेरचा काळ देशाबाहेर...
2006 मध्‍ये हुसेन यांच्‍यावर सातत्‍याने टीका होत होती, त्‍यांच्‍याविरोधात आंदोलने झाली, काही गुन्‍हे दाखल झाले, त्‍यांना जीवे मारण्‍याच्‍या धमक्‍याही दिल्‍या जाऊ लागल्‍या. या सर्व प्रकाराला वैतागून हुसेन यांनी देश सोडला व लंडन आणि दोह्यामध्‍ये ते राहू लागले. 2010 मध्‍ये त्‍यांना कतारचे नागरिकत्‍व मिळाले. 9 जून 2011 मध्‍ये लंडनमध्‍येच त्‍यांचा मृत्‍यू झाला.

 

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, ही आहेत हुसेन यांची वादग्रस्‍त चित्रे.. 

 

बातम्या आणखी आहेत...