आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायपूर - छत्तीसगड पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना भरती करण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत राज्यभरातून 40 अर्ज आलेले आहेत. तृतीयपंथीय आता टाळ्या वाजवून भीक मागण्याचे काम सोडून पूर्ण जोर लावून भरतीसाठी गोळा झाले आहेत. आता भल्या पहाटे ते शारीरिक चाचणी पास करण्यासाठी वर्कआऊट करताना दिसताहेत.
जाणून घ्या, काय आहे भरतीची प्रोसेस...
- भरतीसंबंधात देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, जर किन्नरांनी महिलांच्या कॅटेगरीतून फॉर्म भरला तर त्यांना महिलांसाठीचे भरतीचे सर्व निकष पूर्ण करावे लागतील.
- दुसरीकडे पुरुष कॅटेगरीतून फॉर्म भरल्यास त्यांना पुरुषांच्या भरतीच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागेल.
- त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वर्कशॉपही आयोजित झालेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून पोलिस लाइनमध्ये आयोजित वर्कशॉपमध्ये एएसपी सुरेश चौबे म्हणाले होते की, ट्रांसजेंडर अर्जदार पोलिस स्टेशनमध्ये आला तर त्याला उपस्थित प्रभारी इतरांप्रमाणेच ट्रीट करेल.
आता असे बदलले जीवन...
- मितवाच्या चेअरपर्सन आणि थर्ड जेंडर वेल्फेअर बोर्डाच्या मेंबर विद्या राजपूत म्हणाल्या की, आधी ट्रान्सजेंडर हे समाजासाठी कलंक असायचे. आता तेच पोलिस वर्दी घालून लोकांना सुरक्षितता प्रदान करतील.
- त्या म्हणाल्या की, तमिलनाडू आणि राजस्थानातही त्यांना जॉब मिळवण्यासाठी कोर्टाचे दार ठोठवावे लागले होते.
- छत्तीसगड असे पहिले राज्य बनत आहे, जेथे भरती प्रक्रियेत थेट तृतीयपंथीयांना सामील करण्याचा प्रयत्न होत आहे.
- पूर्वी समाज त्यांना उपेक्षित नजरेने पाहायचा आणि टिंगलटवाळी करायचा. ते केवळ मजबुरीमुळेच भीक मागणे तसेच देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेले होते.
- आता त्यांना सर्वसामान्यांच्या पावलासोबत पाऊल टाकण्याची संधी दिली जात आहे. याचा निश्चितच समाजासाठी चांगला परिणाम दिसून येईल.
फोटो : राकेश पांडेय
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.