आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 70 वर्षांच्या शेतकऱ्याने केली कमाल; 3 वर्षे डोंगर खोदून गाव केले पाणीदार Tribal Man Carves Out Kilometre Long Canal To Irrigate Land In Odisha

70 वर्षांच्या शेतकऱ्याने केली कमाल; 3 वर्षे डोंगर खोदून गाव केले पाणीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिशातील एका शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने गावातील रहिवाशांच्या अडचणी दूर केल्या. 70 वर्षांच्या दैत्री नायक यांनी 3 वर्षे अथक परिश्रम करून गावात एक किलोमीटर लांबीचा ओढा खोदला. विशेष म्हणजे हा परिसर खडकाळ असूनही त्यांनी ही प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आता गावकऱ्यांना दैनंदिन कामांसाठी शिवाय शेतीसाठीही भरपूर पाणी मिळत आहे.

- ही घटना केन्दुझर जिल्ह्यातील आहे. येथे बांसपाल, तेलकोई आणि हरिचंदपूर भागात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. शेतीसाठी सर्वांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. दैनंदिन वापरासाठीही लोक तलावातील घाणेरडे पाणी वापरत होते.

- प्रशासनाने या डोंगराळ परिसरात पाण्यासाठी कोणतीही सुविधा दिली नव्हती. अशा वेळी बैतरणी गावतील दैत्री नायक यांनी गाव पाणीदार करण्याचा चंगच बांधला. दैत्री म्हणाले, ''मी माझ्या कुटुंबासोबत ओढा तयार करण्याचे काम सुरू केले. पाणी आणण्यासाठी मी सतत 3 वर्षे डोंगर खोदला. माझ्या कुटुंबाने दगड हटवण्यासाठी माझी मदत केली. ओढा खोदल्यानंतर मागच्याच महिन्यात गावात पाणी आले आहे.''

 

आता प्रशासनाला आली जाग
केन्दुझर डिव्हिजनमध्ये सूक्ष्म सिंचनाचे इंजीनियर सुधाकर बेहरा म्हणाले, ''आम्हाला माहिती मिळाली होती कि, एका व्यक्तीने कर्नाटक नालामधून पाणी नेण्यासाठी ओढा खोदला आहे, जेणेकरून शेतीसाठी सुविधा व्हावी. आम्ही त्या गावाचा दौरा करू, तेथे सिंचनाची सुविधा देण्यासाठी आवश्यक पावले उचलू.''

 

बातम्या आणखी आहेत...