आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • OMG: एकाच मांडवात नवरदेवाने केले 3 नवरींशी लग्न, 12 वर्षांपासून राहत होते लिव्ह इनमध्ये Tribe Youth Married With Three Brides Near Udaipur

एकाच मांडवात नवरदेवाने केले 3 नवरींशी लग्न, 12 वर्षांपासून राहत होते लिव्ह-इनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर/झाडोल - अडोल गावातील दिव्यांग नक्कालाल कसौटिया (32 वर्षे) याने एकाच मांडवात 3 महिलांशी लग्न केले आहे. हा तरुण यातील पहिल्या महिलेसोबत 12 वर्षे, तर दुसऱ्या महिलेसोबत 8 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दुसरीकडे, तिसरी नववधू ही नक्कालाल याची मेहुणी आहे. यासोबतच ती त्याच्यासोबत वर्षभर लिव्ह इनमध्ये राहिली होती.

 

असे आहे प्रकरण

वास्तविक, नक्कालालला लहानपणी पोलियो झाला होता. त्याच्या आयुष्यात आलेली पहिली महिला अलसीगडची कंतुबाई त्याच्याहून 13 वर्षे मोठी आहे. नक्कालाल बिनालग्नाचे मागच्या 12 वर्षांपासून तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. 8 वर्षांपूर्वी गिर्वामधील फोफटी गावातील पुनकीशी त्याचे प्रेम जुळले, मग त्याने तिलाही आपल्या घरी आणले. पुनकीसुद्धा दिव्यांग आहे. यानंतर कंतुबाई आणि पुनकी दोघीही नक्कालालसोबत राहू लागल्या.

पत्नी आणि प्रेयसीला अपत्य झाले नाही, मग मेहुणीलाही घेऊन आला नक्कालाल
- कंतुबाई आणि पुनकी दोन्हींकडून त्याला अपत्य न झाल्याने गतवर्षी नक्कालाल आपल्यापेक्षा 5 वर्षांनी लहान 27 वर्षीय रेखालाही सोबत घेऊन आला. यानंतर ते तिघेही सोबत राहू लागले. रेखा गर्भवती झाल्यावर नक्कालालने विवाह करण्याचा विचार केला. बुधवारी त्याने आपल्या तिन्ही लिव्ह इन पार्टनरसेाबत आपल्या घरीच नातेवाइकांच्या उपस्थितीत एकाच मांडवात लग्न केले.

 

या आदिवासींमध्ये कॉमन आहे लिव्ह इन रिलेशनशिपची पद्धत
- लिव्ह इन रिलेशनशिपची ही पद्धत फक्त पाश्चात्य देशांतच नाही, तर आदिवासी समुदायातही प्रामुख्याने आहे. उदयपुर जिल्ह्यातही मोठा परिसर आदिवासी बहुल आहे. येथील आदिवासींमध्ये दीर्घकाळापासून ही परंपरा आहे. येथे अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न करण्याची परंपरा आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...