आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरा विधानसभा निवडणूकः 59 जागांसाठी मतदान, 3 वाजेपर्यंत 65% व्होटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगरतळा - त्रिपुरा येथे विधानसभा निवडणुकीत 60 पैकी 59 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. एका जागेवर माकप उमेदवाराचे निधन झाल्याने त्या ठिकाणी 12 मार्चला मतदान होणार आहे. राज्यात गेल्या 25 वर्षांपासून डाव्यांची सत्ता आहे. पण, यावेळी भाजपकडून टक्कर मिळू शकते असे वर्तवले जात आहे. या निवडणुकीचे निकाल 3 मार्च रोजी जाहीर केले जातील. यापूर्वी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत माकपचे 49, काँग्रेस 10 उमेदवार निवडून आले होते. तर भाजपने खाते सुद्धा उघडले नव्हते. तसेच भाजपच्या 49 उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले होते. 

 

- रविवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू होते. 3,214 पोलिंग बूथवर व्होटिंग घेण्यात आले.

- चारिलम जागेवर उमेदवार राहिलेले सीपीएम नेते रामेंद्र नारायण देब बर्मा यांचे 13 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यामुळे, येथील मतदानाची तारीख 12 मार्च जाहीर करण्यात आली आहे. 

 

किती उमेदवार रिंगणात?
- 60 जागांसाठी 307 उमेदवार रिंगणात आहेत. 
- माकपने 57 आणि लेफ्ट फ्रंटने उमेदवार उतरवले.
- भाजप 51 जागांवरून लढत असून त्यांचा सहकारी आयपीएफटी पक्षाचे 9 उमेदवार मैदानात आहेत. 
- काँग्रेस 59 जागांवरून लढत आहे. टीएमसीने फक्त 25 उमेदवार उतरवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...