आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी शोधण्याऐवजी पानटपरी सुरू करा, त्रिपुराच्या CM चे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिप्लब देब म्हणाले होते, महाभारताच्या काळात धृतराष्ट्रला संजयने सर्वकाही सांगितले होते. म्हणजेच तेव्हाही इंटरनेट होते. - Divya Marathi
बिप्लब देब म्हणाले होते, महाभारताच्या काळात धृतराष्ट्रला संजयने सर्वकाही सांगितले होते. म्हणजेच तेव्हाही इंटरनेट होते.

- बिप्लब म्हणाले, प्रत्येक घरात किमान एक गाय असायला हवी.

- गुरुवारी बिप्लब म्हणाले होते, डायना हेडनमध्ये असे काय होते की ती 1997 मध्ये मिस वर्ल्ड बनली. 


आगरतळा - त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी म्हटले आहे की, तरुणांनी सरकारी नोकरीसाठी नेत्यांकडे चकरा मारण्याऐवजी पानटपरी सुरू केली तर बरे झाले अशते. त्याने त्यांच्या खात्यांमध्ये 5-10 लाख रुपये तरी आले असते. 


महत्त्वाचा काळ वाया घालवू नका 
बिप्लब देब यांनी शनिवारी जागतिक पशुपालन दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात म्हटले होते की, तरुण नोकरीसाठी अनेक वर्षे राजकीय नेत्यांकडे चकरा मारत राहतात. जीवनातील महत्त्वाचा निर्णय ते यात वाया घालवतात. याऐवजी त्यांनी पानटपरी सुरू केली असती तर त्यांच्या खात्यात 5-10 लाख जमा असते. 


यापूर्वीही केले वादग्रस्त वक्तव्य 

1) महाभारत काळात इंटरनेट होते 
बिप्लब म्हणाले होते, महाभारत काळातमध्ये तांत्रिक सुविधा होत्या. त्यात इंटरनेट आणि सॅटेलाइटचाही समावेश होता. महाभारतात संजयने धृतराष्ट्राला कुरूक्षेत्रात काय काय घडत आहे हे सर्व सांगितले होते. संजयला एवढ्या लांबचे कसे दिसत होते. त्याचा अर्थ त्या काळातही तंत्रज्ञान इंटरनेट आणि सॅटेलाइट होते. 


2) डायना हेडन मिसवर्ल्ड बनली कशी 
गुरुवारी ते म्हणाले होते, भारताने सलग पाच वर्षे मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स किताब जिंकले. पण डायना हेडनला किताब मिळाला तो निर्णय मला समजला नाही, तुम्हाला वाटते का तिला किताब मिळायला हवा होता. त्यानंतर वाद झाल्यानंतर ते म्हणाले होते, प्रत्येक महिला माझ्यासाठी आईसमान आहे.  


मॅकेनिकल इंजिनीअरिंग करणाऱ्यांनी आयएएस बनू नये 
शनिवारी ते म्हणाले होते, मॅकेनिकल इंजिनीअरींग करणाऱ्यांनी नागरी सेवांमध्ये जायला नको. कारण त्यांना समाज निर्मिती करायची असते. सिव्हील इंजिनीअर्सना त्याचे ज्ञान असते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...