आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालय-नागालँड-त्रिपुरा निवडणूक: मतमोजणीला सुरूवात, काँग्रेस, भाजप,डाव्‍यामध्‍ये तिरंगी लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगरतला/काेहिमा/शिलाँग- ईशान्येतील मेघालय, नगालँड आणि त्रिपुरा या तीन राज्‍यातील विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी बॅलेट पेपरची मोजणी करण्यात येत आहे. या राज्‍यांमध्‍ये काँग्रेस-भाजप व डाव्‍यामध्‍ये तिरंगी लढत हाेत अाहे. भाजप आणि आरएसएसने पूर्ण शक्ती पणाला लावली अाहे. पंतप्रधान माेदी, अमित शहा व केंद्रीय मंत्र्यांसह १०० हून अधिक नेत्यांनी प्रचार केला आहे. त्रीपूरामध्‍ये 25 वर्षापासून सत्‍तेत असलेल्‍या डावे याही वेळेस सत्‍तेत येण्‍याची चिन्‍हे दिसतं आहे. नागालँडमध्ये सत्तारूढ एनपीएफची लढत भाजप-एनडीपीपी अाघाडीशी, तर मेघालयात काँग्रेस-भाजप-एनपीपी अशी तिरंगी लढत हाेत अाहे.

 


भाजपच्या १०० हून अधिक नेत्यांनी केला प्रचार
ईशान्येत फक्त मेघालय व मिझाेराममध्ये काँग्रेसचे सरकार अाहे. ही दाेन्ही राज्ये ख्रिश्चनबहुल अाहेत. मेघालयात भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली अाहे. पंतप्रधान माेदी, अमित शहा व केंद्रीय मंत्र्यांसह १०० हून अधिक नेत्यांनी प्रचार केला. काँग्रेसने बीफ व चर्चचा मुद्दा उचलला, तर भाजपने कांॅग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्लाबाेल केला.

 

काँग्रेस-भाजप व एनपीपीत काट्याची लढत
मेघालयात काँग्रेस-भाजप व एनपीपीमध्ये तिरंगी लढत हाेत अाहे. राज्यात एनपीपी प्रथमच ५७ जागांवर निवडणूक लढवत अाहे. येथे भाजपने एनपीपीपासून अंतर ठेवले अाहे; परंतु मणिपूरमध्ये एनपीपीच्या टेकूवरच भाजपचे सरकार अाहे. त्यामुळे एनपीपी ही भाजपची बी-टीम असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात अाहे.


नागालँडमध्ये ५४ वर्षांत प्रथमच सर्वाधिक ५ महिला रिंगणात
नागालँडमध्ये १२ निवडणुका झाल्या अाहेत; परंतु एकाही महिलेला अामदार होण्याची संधी मिळालेली नाही. यंदा पाच महिला उमेदवार असून, ११.९१ लाख मतदार अाहेत.नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागा अाहेत; परंतु माजी मुख्यमंत्री व एनडीपीपीचे प्रमुख नेफ्यू रियाे यांची बिनविराेध निवड झाल्याने अाता मंगळवारी ५९ जागांसाठी मतदान झाले अाहे. त्यासाठी २२७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात पाच महिला अाहेत. भाजपने नागा पीपल्स फ्रंटशी (एनपीएफ) असलेली अाघाडी ताेडून एनडीपीपीशी हातमिळवणी केली अाहे. भाजपने २०, तर एनडीपीपीने ४० उमेदवार दिले अाहेत. काँग्रेसने १८, तर एनपीएफने ५८ जागांवर उमेदवार उतरवले. राज्यात अातापर्यंत १२ विधानसभा निवडणुका झाल्या अाहेत; परंतु या ५४ वर्षांत एकाही महिलेला अामदार बनण्याची संधी मिळालेली नाही. यंदा एक महिलाही निवडून अाली, तर राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला विधानसभेत पाऊल ठेवेल. पहिल्यांदाच पाच महिला रिंगणात उतरल्या अाहेत. २००८ मध्ये सर्वाधिक चार महिला निवडणूक रिंगणात होत्या.


नागालँडमध्ये २० वर्षांनंतर निवडणुकीवर बहिष्कार
दाेन दशकांनंतर नागालँडमध्ये नागा नेते, नागरी संघटना व मुख्य नागा अादिवासी संघटना ‘हाे-हाे’ने या निवडणुकीवर बहिष्काराची घाेषणा केली अाहे. निवडणूक हाेऊ नये, अशी एनएससीएनचीही इच्छा अाहे. मात्र, निवडणूक हे घटनात्मक कार्य अाहे व नागा नागरिकांच्या समस्या साेडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्राने स्पष्ट केले अाहे.


मेघालयमध्ये २५ वर्षांत भाजपचे प्रथमच ४७ मतदारसंघांत उमेदवार
मेघालयात भाजप १९९३ पासून विधानसभा निवडणुका लढवत अाहे. भाजपने या वेळी पहिल्यांदाच सर्वाधिक ४७ जागी अापले उमेदवार दिले अाहेत. मेघालयातही ५९ जागांसाठी मंगळवारी मतदान हाेत अाहे. एनसीपीचे उमेदवार जाेनाथन संगमा यांचा उग्रवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने एका जागेचे मतदान स्थगित करण्यात अाले अाहे. राज्यात ३२ महिलांसह ३७० उमेदवार रिंगणात असून, १८.४ लाख मतदार अाहेत. मेघालयात गत १० वर्षांपासून काँग्रेसचे सरकार अाहे. मात्र, या वेळी त्यांना भाजप व नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) माेठे अाव्हान अाहे. भाजप राज्यात मागील २५ वर्षे व ५ विधानसभा निवडणुकांपासून अापले उमेदवार देत अाहे. मात्र, या निवडणुकीत पक्षाने सर्वात जास्त ४७ उमेदवार उतरवले अाहेत. या ५ निवडणुकांत केवळ तीनदा अापले खाते उघडले अाहे. अातापर्यंत निवडणूक लढवलेल्या ८० % उमेदवारांची अनामत जप्त झाली अाहे. २०१३ मध्ये भाजपने १३ जागांवर निवडणूक लढवली हाेती; परंतु सर्वांची अनामत जप्त झाली हाेती. पक्षाने २००३ मध्ये सर्वाधिक २८ जागांवर निवडणूक लढवली हाेती व दाेन जागा जिंकल्या हाेत्या.

 

त्रिपुरा : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?

 

पक्ष 2013 मधील जागा 2013 मधील वोट शेअर
सीपीएम 49 48.1%
काँग्रेस 10 36.5%
भाजप 00 1.5%
इतर 01 13.9%

 

 

मेघालय : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?

 
पक्ष 2013 मधील जागा 2013 मधील वोट शेअर
काँग्रेस 29 34.8%
एनपीपी 02 8.8%
भाजप 00 1.3%
इतर 29 55.11%

 

 

नागालँड : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?

 
पक्ष 2013 मधील जागा 2013 मधील वोट शेअर
एनपीएफ 38 47.2%
काँग्रेस 08 25%
भाजप 01 1.8%
इतर 13 26%
 
बातम्या आणखी आहेत...