आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरातील शपथविधी सोहळ्यात मोदींसह 350 पाहुणे;भाजपचे बिपलब देव नवे मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा | डाव्यांचा त्रिपुरातील बालेकिल्ला सर केल्यानंतर शुक्रवारी भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून बिप्लव देव यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी देव यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा शपथविधीला उपस्थित होते. - Divya Marathi
आगरतळा | डाव्यांचा त्रिपुरातील बालेकिल्ला सर केल्यानंतर शुक्रवारी भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून बिप्लव देव यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी देव यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा शपथविधीला उपस्थित होते.

आगरतळा- त्रिपुरात बिपलब कुमार देव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व जिष्णू देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकारच्या शपथ समारंभात भाजपने शक्तिप्रदर्शन केले. समारंभात भाजपाध्यक्ष अमित शहा,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मार्गदर्शक सदस्य अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गृहमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, चार राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे सरचिटणीस राम माधव, राज्याच्या प्रभारींसह सुमारे ३० नेते आगरतळा येथे पोहोचले. व्यासपीठावर ‘डावे’,‘उजवे’ विचारसरणीचे विलक्षण चित्र पाहायला मिळाले. भाजपच्या निमंत्रणावर मुख्यमंत्री माणिक सरकारदेखील यांच्यासह १३ राज्यांचे मुख्यमंत्री, ११ केंद्रीय मंत्र्यांसह ३५० व्हीआयपींची हजेरी लावली होती. 

 

माणिक सरकार पक्ष कार्यालयात पोहोचले

माणिक सरकार यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला व त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालय सोडले. ते पत्नीसह पक्ष कार्यालयात स्थलांतरित झाले. माकप कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर दोन खोल्यांत त्यांनी बस्तान मांडले आहे.


त्रिपुराचे भाजपाध्यक्षही
४८ वर्षांचे बिपलब यांचा जन्म उदयपूरमध्ये झाला. पश्चिम त्रिपुराच्या बनमालीपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्रिपुरा विद्यापीठातून १९९९ मध्ये त्यांनी पदवी संपादन.स्वच्छ प्रतिमा. त्यांच्या नावे एकूण ५.८५ कोटी रुपयांची संपत्ती दाखवली.

 

 

आणखी काय म्हणाले मोदी... 
- त्रिपुराच्या जनतेला धन्यवाद देताना मोदी म्हणाले,'हे तुमच्या शिवाय शक्य नव्हते. त्रिपुराच्या जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की ज्यांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांनी नाही केले हे दोघांचेही सरकार आहे. त्रिपुराचा विकास ही आमची सामुहिक जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.'
- विजयी झालेल्या उमेदवारांचे मोदींनी अभिनंदन केले. विरोधी पक्षाच्या विजयी उमेदवारांना मोदी म्हणाले, 'तुमच्याकडे अनुभव आहे. आमची टीम नवी आहे. ते वयानेही तुमच्यापेक्षा लहान आहेत. तुमच्या अनुभवाचा त्यांना फायदा होऊ द्या. सत्तेत आलेल्या लोकांकडे ऊर्जा आहे. त्रिपुराला पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे.'

 

भाजपला बहुमत 

- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरात भाजपला बहुमत मिळाले होते. येथे 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टीचा (सीपीएम) भाजपने पराभव केला होता. भाजपला येथे 35 आणि त्यांचा सहकारी पक्ष इंडीजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला (आयपीएफटी) 8 जागा मिळाल्या होत्या. 

 

कोण आहे बिप्लव देव? 
- 48 वर्षांचे बिप्लव कुमार देव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म उद्यपुरमध्ये झाला होता. पश्चिम त्रिपुरातील बनमालीपूर मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. 
- संघाशी संबंधीत बिप्लव देव यांची स्वच्छ प्रतिमा आहे. त्यांच्यावर एकही क्रिमिनल केस नाही. निवडणूक शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5.85 कोटी आहे. 
- त्रिपुरा विद्यापीठातून 1999 मध्ये बिप्लव यांनी ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. त्यानंतर ते सामाजिक कार्यात उतरले. भाजपचे थिंक टँक राहिलेले गोविंदाचार्य यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. 

- बिप्लव यांनी त्रिपुरामध्ये अगदी तळागाळाच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी परीश्रम घेतले. निवडणुकीपूर्वी ते म्हणाले होते, येथे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. 
- भाजप सत्तेत आले तर हे राज्य आदर्श राज्य बनवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. जनतेपर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्यात बिप्लव  यांना यश आले. 
- त्यांच्या नेतृत्वात डाव्यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये आले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 1600 पेक्षा अधिक लेफ्ट सपोर्टर्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला होता.

 

जिष्णू देव वर्मा कोण आहेत? 
- जिष्णू देव वर्मा हे राज्याच्या जनजाती मोर्चाचे संयोजक आहेत. ते सध्या आमदार नाहीत. चारिलाम मतदारसंघात डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. या जागेवर 15 मार्चला मतदान होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...