आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर- बरीपाल रेल्वे क्रॉसिंगवर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. भरधाव ट्रकने चार दुचाकीस्वारांना चिरडले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेट असून त्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
रेल्वे फाटकवरती उभे होते दुचाकीस्वार...
- सजेती जवळील बरीपाल रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ ही घटना घडली. काल (मंगळवार) सायंकाळी 4 वाजता रेल्वे गेट बंद झाले. गेटच्या दोन्ही बाजूला वाहने उभी होती. गेट उघडताच एक भरधाव ट्रकने दोन दुचाकींस्वारांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका जवानाचा समावेश आहे. राजकुमार शंखवार असे त्याचे नाव आहे. मोहोब येथे ते तैनात होते.
दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी
या अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघे काही वेळ रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कानपूरच्या जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
ट्रकचालक फरार
अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.