आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्मा मक्कल मुनेत्र कझगम: दिनाकरन यांनी जयललितांच्या नावाने केली पक्षाची स्थापना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदुराई- तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पक्षाची भर पडली आहे. अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते आणि भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असलेल्या व्ही.के. शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आर. के. नगरमधून अपक्ष निवडून आलेले आमदार दिनाकरन यांच्या पक्षाचे नाव माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या नावावरुन ठेवले आहे. अम्मा मक्कल मुनेत्र कझघम असे या पक्षाचे नाव घोषित करण्यात आले आहे.  


या पक्षाचे निवडणूक चिन्ह दोन पानाचेच असेल. अण्णाद्रमुकच्या निशाणीवर दिनाकरन दावा सांगत आहेत. यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अम्मा मक्कल मुनेत्र कझघमची निशाणी प्रेशर कुकर असणार आहे. आगामी निवडणुकीत दिनाकरन स्वत:ला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रचार करणार आहेत. नवे नाव आणि पक्षाचा झेंडा घेऊन आपण पुढील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


का स्थापन केला पक्ष?
- माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेमध्ये उभी फूट पडली. सध्या मुख्यमंत्री ई. पलानीसामी (ईपीएस) आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम (ओपीएस) यांच्या हाती पक्षाची सुत्रे आहेत. ओपीएस पक्षाचे संयोजक आणि ईपीएस सहसंयोजक आहेत. 


जयललिताच्या मतदारसंघात मिळवला विजय 
दिनाकरण यांनी नुकताच आरके नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा राजकीय पाया पक्का झाला. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 


एआयएडीएमकेने म्हटले होते, सारखे नाव नको 
- दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते की, दिनाकरण यांच्या गटाला वेगळे नाव आणि निवडणूक चिन्ह कुकर दिले जावे. 
- त्यानंतर एआयएडीएमकेने त्यांच्या पक्षाशी मिळते जुळते नाव असले तर कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता. 


तीन महिन्यात पडणार सरकार 
- दिनाकरण यांनी नुकताच दावा केला होता की, राज्यतील सध्याचे सरकार तीन महिन्यात कोसळेल. त्यांच्याकडे 27 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यापैकी 18 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. सध्या हे प्रकरण मद्रास हायकोर्टात प्रलंबित आहे. 


तमिळनाडूमध्ये लाँच झालेला दुसरा पक्ष 
- एएमएमके यावर्षी तमिळनाडूमध्ये लाँच झालेला दुसरा पक्ष आहे. यापूर्वी तमिळ सुपर स्टार कमल हासनने 21 फेब्रुवारीला मक्कल नीति मय्यम (एमएनएम) नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्याचा अर्थ जन न्याय केंद्र असा होतो. 
- दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांतही लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. पण अद्याप त्याची तारीख स्पष्ट झालेली नाही. सध्या रजनीकांत धार्मिक यात्रेवर निघालेले आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...