आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TVS Zeppelin Cruiser Motorcycle Concept; Expected Launch 2018 पेट्रोल अन् बॅटरी दोन्हींवर चालेल ही पॉवरफुल Bike

पेट्रोल अन् बॅटरी दोन्हींवर चालेल ही पॉवरफुल Bike, एवढी कमी असेल किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - TVSने या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये आपली कॉन्सेप्ट बाइक TVS Zeppelin सादर केली होती. कंपनी या बाइकवर सातत्याने संशोधन करत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच वर्षी ही बाइक लाँच होऊ शकते. ही क्रूझर बाइक दिसण्यात जेवढी पॉवरफुल आहे तेवढीच हायटेकही आहे. ही कंपनीची अशी बाइक आहे ज्यात 220cc च्या पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटारही देण्यात आली आहे. 


# 1200 वॉटची मोटार
या बाइकमध्ये 1200 वॉटची रिजनरेटिव्ह असिस्ट मोटार देण्यात आली आहे, जी 48 व्होल्टच्या लिथियम आयन बॅटरीसोबत येते. ही एवढी पॉवरफुल आहे की, 20% पर्यंत जास्त टॉर्क जनरेट करते. तथापि, तिचे इंजिन किती पॉवर आणि किती टॉर्क जनरेट करेल, याबाबत कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

 

# स्टायलिश लूक आणि फीचर
जेपलिनच्या डिझाइनबाबत बोलायचे झाल्यास यात रोबोटच्या फेससारखी LED लॅम्प देण्यात आली आहे. ही फ्लॅट आणि खूप रुंद आहे. यात हॅलोजनसारखी दिसणारी लाइटही लागलेली आहे. बाइकमध्ये दमदार अलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर मिळतील. बाइकवर दोन जण सहज बसू शकतील. कंपनीने या बाइकमध्ये बायो नावाचे स्मार्ट अॅक्सेस स्विचही दिले आहे. तथापि, हे काम कसे करेल याबाबत कोणतीही माहिती नाही. बाइकमध्ये अॅक्शन कॅमेरा, क्लाउड कनेक्टिव्हिटी असणारे एन्फोटेनमेंट मीटर आणि कंट्रोल करण्यासाठी ABS ही देण्यात आले आहे.

 

# एवढी आहे किंमत
कंपनीने सध्या याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार याची किंमत 1.20 लाख ते 1.80 लाख रुपयांपर्यंत असू शकते. जर याची किंमत 1.2 लाखांच्या जवळ राहिली तर ही बाइक बजाज अॅव्हेंजर, सुझुकी इंट्रूडरला स्पर्धा देऊ शकते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, TVS जेपलिनचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...