आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमुनानगर : 12 वीच्या विद्यार्थ्याने प्रिंसिपलवर झाडल्या गोळ्या, शाळेत सुरू होती पॅरेंट्स मिटींग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर - येथील थॉपर कॉलनीतील स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेची गोळ्या घालून हत्या केली. जखमी मुख्याध्यापिकेवर सुमारे 2 तास उपचार केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्याध्यापिका छळ करत होती, असा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. 


शनिवार सकाळची घटना.. 
ही घटना शनिवारी सकाळी 11:30 वाजता घडलेली आहे. घटनेच्या वेळी शाळेमध्ये पॅरेंट्स मिटींग सुरू होती. 

 

आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न 
घटनेनंतर आरोपी विद्यार्थ्याने शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला पकडले आणि त्याची चांगीलच धुलाई केली. त्यामुळे त्याला तो चांगलाच जखमी झाला. 


तीन फायर केले. 
स्वामी विवेकानंद शाळेच्या मृत मुख्याध्यापिकेचे नाव आहे, व्ही.पी.छाबडा. घटनेच्या वेळी त्या त्यांच्या रूममध्ये होत्या. विद्यार्थ्याने त्यांच्यावर तीन फायर केले. एक गोळी त्यांच्या चेहऱ्यावर लागली एक खांद्यावर तर एक हातावर लागली. गोळी लागताच त्या जखमी होऊन खाली कोसळल्या. पळून जाणाऱ्या आरोपीला लोकांनी पकडले. लोकांनी त्याला असे करण्याचे कारण विचारले तेव्हा, प्रिन्सिपल टॉर्चर करत होत्या त्यामुळे त्याला गोळ्या घातल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS..