आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन मुलींचे नाव ठेवले 'नकाेशी', अाधारवरही तेच; मध्‍यप्रदेशातील धक्‍कादायक प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसाैर - मध्य प्रदेशातील बिल्लाैद गावातील दाेन मुलींचे नाव त्यांच्या अाई-वडिलांनी 'नकाेशी' ठेवले अाहे. हा धक्कादायक प्रकार असून, या मुलींचे नाव अाधार कार्डासह जन्मदाखला व शाळेतही हेच असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

 

या गावातील कैलाशनाथ व त्यांची पत्नी कांताबाई या दांपत्याला आधीच चार मुली हाेत्या. त्यामुळे एक तरी मुलगा असावा अाणि अाता एकही मुलगी नकाे, अशी दाेघांची इच्छा हाेती. त्यासाठी त्यांनी अनेक देवी-देवतांना नवस केले, काही उपायदेखील केले; परंतु पाचव्यांदाही त्यांना मुलगीच झाली. त्यामुळे त्यांनी पाचव्या मुलीचे नाव 'नकाेशी' ठेवले. यापैकी एका मुलीने 'सध्या मी बी.एस्सी. करत अाहे' असे 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.


पूर्वी मला या नावात काहीही वावगे वाटत नव्हते; परंतु अर्थ कळला व साेबतचे सहकारी अन् मित्र माझी टर उडवू लागले तेव्हा लाजिरवाणे वाटू लागले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यावेळी प्राचार्य लक्ष्मीनारायण पाटीदार यांना नाव बदलण्यास सांगितले; परंतु अाता काहीही हाेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.या मुलींची अाई कांताबाई यांनी सांगितले की, पाचव्या मुलीचे नाव 'नकाेशी' ठेवण्याचा सल्ला रुग्णालयातील एका परिचारिकेने दिला हाेता. असे नाव ठेवल्यास नंतरचे अपत्य मुलगा हाेताे, असे तिचे म्हणणे हाेते. मात्र, त्यानंतरही मुलगीच झाली.