आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर : पुलवामा येथे सकाळपासून चकमक सुरु, सुरक्षारक्षकांनी एक दहशतवादी मारला, 2 जवान शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रालच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. (फाइल) - Divya Marathi
त्रालच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. (फाइल)

श्रीनगर - पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यात एक दहशतवादी मारला गेला असून दोन जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी सकाळी सुरु झालेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला, यात भारतीय लष्कर आणि पोलिसांचे दोन जवान शहीद झाले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु आहे. 


जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची मिळाली होती माहिती 
- साऊथ काश्मीरमधील त्रालच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची लष्कराला माहिती मिळाली होती. लष्कर आणि सीआरपीएफच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने मंगळवारी सकाळी सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात एक जवान जखमी झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
- सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. या दरम्यान, दहशतवाद्यांच्या एका गोळीने पोलिस जवान शहीद झाला. 

सर्च ऑपरेशनमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोनची मदत 
- लष्कराने सांगितले, की अजुनही चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...