आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर पतीच्या हत्येचा पत्नीनेच रचला कट, प्रियकरासोबत राहण्यासाठी दिली 5 लाखांची सुपारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद (यूपी) - पोलिसांनी कारवाई करत शुक्रवारी दोन सुपारी किलरना अटक केली आहे. एका डॉक्टरची हत्या करण्यासाठी जात असताना या शार्प शूटर्सना पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून पिस्तूल आणि दोन मॅगझिन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

डॉक्टरच्या पत्नीनेच दिली होती सुपारी 
तेलियरगंज परिसरात क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरच्या हत्येची सुपारी त्याच्या पत्नीनेच दिली होती. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पतीच्या बंगल्यात राहण्याचे होते. म्हणूनच तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला. विवाहितेने प्रियकरासोबत मिळून डॉक्टरची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. दोन्ही शार्प शूटर्सना गुरुवारी डॉक्टरवर गोळीबारही केला होता.
- सुदैवाने त्या हल्ल्यात डॉक्टर बालंबाल बचावले. पोलिस याप्रकरणी डॉक्टरची पत्नी आणि तिच्या प्रियकरासोबतच आणखी एकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत पतीच्या बंगल्यात राहण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचला होता.

 

बातम्या आणखी आहेत...