आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये दोन हल्ले: अतिरेकी हल्ल्यात दाेन जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामाच्या कोर्ट परिसरातील पोलिस चौकीवर हल्ला केला. - Divya Marathi
मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामाच्या कोर्ट परिसरातील पोलिस चौकीवर हल्ला केला.

> केंद्र सरकारने रमजानच्या महिन्यात खोऱ्याच सर्च ऑपरेशनवर बंदी घातली आहे, मात्र घुसखोरी आणि दहशतवाद्यांकडून हल्ले सुरुच.

> भारतीय सैन्याने गेल्या चार वर्षांमध्ये 619 दहशतवाद्यांना ठार केले. 

 

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पुलवामात पोलिस दलावर व अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या तळावर सकाळी दहशतवादी हल्ला झाला. त्यात दोन पोलिस शहीद झाले आणि तीन पोलिसांसह ११ जवान जखमी झाले.    पुलवामा न्यायालयाच्या परिसरात  तैनात पाेलिस ताफ्यावर दहशतवाद्यांनी सकाळी गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरही दिले. दुसरा हल्ला अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या तळावर ही घटना घडली. सुमारे ३ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ८ जवान जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

 

पुलवामामध्ये कोर्ट परिसरात पोलिसांवर हल्ला 
- मंगळवारी पुलवामा येथे कोर्ट परिसरातील पोलिस चौकीवर हल्ला करण्यात आला. यात दोन जवान शहीद झाले असून तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या फायरिंगाल तोडीसतोड उत्तर दिले आहे. 

 

अनंतनागमध्ये सैन्यावर ग्रेनेड हल्ला 
- पोलिस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सीला सांगितले, की अनंतनागच्या जंगलात मंडी येथे पेट्रोलिंग करत असलेल्या सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यात 5 जवान जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...