आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता-खेळता बाथरूममध्ये पोहोचला चिमुरडा, बहिणीने पाहिले आणि अचानक किंचाळू लागली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - शहरात दोन वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टबमध्ये बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा मुलगा खेळत खेळत बाथरूममध्ये गेला आणि त्याठिकाणी ठेवलेल्या पाण्याच्या टबमध्ये पडला. त्याचे डोके पाण्यात बुडालेले असल्याने त्याचा श्वास गुदमरला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 


आई सोनियाने सांगितले की, 10 मिनिटांपूर्वीच त्यांनी मुलगा दीपांशूला खेळताना पाहिले होते. तो नेहमी घराच्या अंगणात सायकल खेळायचा. पण तो नेमका बाथरूमपर्यंत केव्हा आणि कसा पोहोचला हे त्यांनाही समजलेच नाही. 


अशी घडली घटना.. 
- सेक्टर-36 मधील एका हवेलीत सर्व्हंट क्वार्टरमध्ये पंकज, त्यांची पत्नी सोनिया, मुलगा दीपाशू आणि मुलगी प्रिया हे राहतात. पंकज एक खासगी कँटीन चालवतात. तर सोनिया हवेलीत स्वयंपाकाचे काम करतात. 
- सोमवारी सायंकाळी सुमारे साडे 6 वाजता त्या स्वयंपाक करत असताना मुलगा खेळत खेळत बाथरूमपर्यंत गेला. त्याठिकाणी पाण्याने भरलेला टब होता. त्याने तो टब पाहिला आणि तिथे खेळताना तो टबमध्ये पडला. पाण्यात तोंड बुडाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. दीपाशूची बहीण प्रिया खेळताना त्याठिकाणी पोहोचली. भावाला अशा अस्थेत पाहून ती ओरडू लागली. 
- सोनिया पळत बाथरूममध्ये आली. तिने मुलाला लगेच बाहेर काढले आणि मालकाकडे गेली. त्यांनी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...